वाशिम,दि29(अशोक पडघम):-26 मे रोजी मालतीबाई सरनाईक कन्या शाळा वाशिम येथे प्रसंग करिअर अकॅडमी मार्फत चाळणी परीक्षा घेण्यात आली, बार्टी पुणे च्या माध्यमातून SC च्या विद्यार्थ्यांसाठी बँक रेल्वे lic तत्सम लिपीक वर्गीय परीक्षेसाठी मोफत क्लासेस ची सुविधा देण्यात येते. परंतु संस्था संचालक आपल्या संपर्कातील विद्यार्थाची यामध्ये निवड करून संगनमत करून आजवर हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळेस अशाच सावळा गोंधळ प्रसंग करिअर अकँडमी जयपूर , वाशिम या संस्थेत घडला. अशा बोगस निवड करून संचालक मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याने अशा प्रकरनाला आळा घालण्यासाठी बार्टी पुणे तर्फे कुठली उपाययोजना राबविण्यात येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. जवळच्या विद्यार्थाना कोरे पेपर ठेवण्यासाठी सांगण्यात आले जेणे करून नंतर त्यांना संगनमत करून त्या विध्यार्थ्याला पात्र करता येईल, आणि विद्यार्थी उपस्थित असतानाही त्याला गैरहजर दाखविण्यात आले , याच संस्थेचे अन्य ठिकाणीही बार्टी मार्फत शाखा चालविल्या जातात सदर चालू असलेल्या गैरप्रकाराला आला घालण्यासाठी बार्टी मार्फत काय उपाययोजना राबविण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment