भोपाळ,दि.12: चार महिनांच्या कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून करणाऱ्या नराधमाला इंदौर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या 22 दिवसांत या गुन्ह्याचा निकाल आला आहे. गेल्या 20 एप्रिल रोजी चार वर्षांच्या चिमुरडीवर सुनील भील (21) नावाच्या तरुणानं बलात्कार केला होता.
चार वर्षांची चिमुरडी 20 एप्रिल रोजी तिच्या पालकांसह राजवाडा परिसरात झोपली होती. त्यावेळी सुनीलने तिचे अपहरण केले होते. पोलिस सुरक्षा असतानाही सुनीलने चिमुरडीचे अपहरण केले होते. सीसीटीव्हीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीत सुनील चिमुरडीला शिव विलास पॅलेसमध्ये नेताना दिसत होता. पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. सुनील शिव विलास पॅलेसमधून एकटाच परतल्याचे दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाले होते.
No comments:
Post a Comment