Saturday, 1 December 2018

अंजोराच्या जंगलात आढळले 22 वर्षीय युवतीचे प्रेत


गोंदिया,दि.1- आमगाव तालुक्यातील अंजोरा-हलबीटोलाच्या जंगलामध्ये एका 22 वर्षीय युवतीचे प्रेत आढल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी आमगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील सताप सुरू आहे.

मृत युवतीचे नाव मंजूषा श्रीराम दरवडे (22)  असे असून ती गोंदिया तालुक्यातील गर्रा येथील रहिवासी असल्याचे कळते. ही युवती आमगाव येथे आपल्या मावशीकडे वास्तव्यास होती. ती गेल्या गेल्या 29 नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. ती आज अंजोराच्या जंगलात मृतावस्थेत आढळली. पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...