गोंदिया : भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी सोमवार, १७ डिसेंबर रोजी जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करीत जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांना नवीन जवाबदारी दिली आहे.
विस्तारीत कार्यकारिणीत धनंजय तुरकर यांना किसान आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली असून जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक कदम, नायकराम बिसेन, रेखलाल टेंभरे तर जिल्हा सचिवपदी सुरेश चौरागडे, एम. डी. वालदे, गजेंद्र फुंडे, वसंत गणवीर तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून युवराज लिल्हारे, निलीमा ढोरे, मुन्ना बहेकार, विक्रम बैस यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती आघाडीपदी हर्षपाल रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी आघाडीपदी सदाशिव विठ्ठले, जिल्हा सचिव भाजयुमोपदी सोनु कुथे, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडीपदी सुषमा मेश्राम, जिल्हा सहकार आघाडी महामंत्रीपदी राहूल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment