Tuesday 25 December 2018

अभियंता रामटेककरांच्या पुढाकाराने निराधार मानसिक रुग्ण महिलेस मिळाला शासकीय आसरा

गोंदिया,दि.२४: गोंदिया-बालाघाट या महामार्गावर असलेल्या अंभोरा गावाजवळील बसस्थानकावर गेल्या वर्षभरापासून राहत असलेल्या निराश्रित अवस्थेतील ४७  वर्षीय मानसिक रुग्ण असलेल्या महिलेला जेसीआयचे माजी अध्यक्ष व अभियंता वासुदेव रामटेककर यांनी सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून घेतलेल्या पुढाकारामुळे सदर महिलेला नागपूरच्या मनोरुग्ण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.विशेष म्हणजे या महिलेला आरोग्याची सोय मिळावी आणि ती आपल्या कुटुबांपर्यत पोचावी यासाठी रामटेककर यांनी विविध माध्यमातून प्रयत्न केले.त्यात त्यांना पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांची मोलाची मदत मिळाली.परंतु जवळच असलेल्या रावणवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या असामाजिक कर्तव्याची जाणीवही या प्रकरणात दिसून आल्याची नाराजीही रामटेककरांनी व्यक्त केली.
२ महिन्यापूर्वी या मार्गावरून अभियंता वासुदेव रामटेककर हे जात असताना त्यांना आंभोरा येथील बसस्थानकावरील प्रवासी निवाèयात सदर महिला निराश्रित अवस्थेत आढळून आली.आपले वाहन थांबवून त्यांनी सदर महिलेची आस्थेने विचारपूस केली असता महिलेने शंकुतला देवर असे सांगितले.वडिलांचे नाव घनश्याम तर आईचे लता सांगितले.ओडीसा राज्यातील देऊन्झर तालुक्यातील कादोकला या गावची रहिवासी असल्याचे सांगत बासुदेवपूरच्या कन्या विद्यालयातून आपण मॅट्रिक झाल्याची माहिती दिली.मात्र मानसिक अवस्था योग्य नसल्याने ती अधिक माहिती देऊ शकली नाही.त्यातच रामटेककर यांनी फेसबुक,व्हाटसअपसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून ओडिसा पर्यंत सदर महिलेची माहिती पाठविली.आणि ओडिसा राज्यातील केऊनसर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून सदर महिलेची माहिती देत त्या महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.सतत एक महिना कुटुंबीयांच्या शोध घेतल्यानंतर संपर्क झाला.परंतु गरीब कुटुंब असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी घरातील आर्थिक हलाखीचे चित्रण सांगत तिचे पालनपोषण व उपचार करण्यास असमर्थ असल्याचे सांगत परत घेऊन जायलाही नकार दिला.
यासर्व परिस्थितीत जेव्हा घरचेच कुटूबिंय सदर महिलेला घेऊन जायला तयार नसल्याचे लक्षात येताच महिला बालसंगोपनासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत लेखी पत्र देऊन महिलेचे वैद्यकीय उपचार व पुनर्वसनाची मागणी केली.अशाप्रसंगी पीडित व्यक्तीचे मानसिक चाचणी आवश्यक असल्याने कार्यालयाद्वारे रावणवाडी पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती देण्यात आली.मात्र त्या माहितीवरही रावणवाडी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना कार्यवाही करावेसे न वाटल्याने आणि महिनाभराचा काळ लोटूनही काही होत नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांच्याकडे २१ डिसेंबरला सदर विषय पोचविला.आणि रामटेककरांनी सांगितलेले घटनाक्रम एकूण पोलिस अधीक्षकांच्या मनातही त्या महिलेबद्दल आपुलकी निर्माण होत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात लगेच रावणवाडीचे पोलिस उपनिरीक्षक मते यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.त्यानंतर मात्र लगेच दुसèया दिवशी २२ डिसेंबरला रावणवाडी पोलिस स्टेशनचे हवालदार रुबेलाल उईके, सुनील शेगोकर,महिला पोलिस सविता बिसेन व वैशाली सादेल यांच्या चमूने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या महिलेला सोबत नेऊन मानसिक तपासणी करवून घेतली.आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मनोरुग्नालय नागपूर येथे पुढील उपचार व पुनर्वसनाकरिता पाठविले.
उपचारानंतर अशा महिलांना शासकीय महिला आश्रमात ठेवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते.विशेष म्हणजे वर्षभर या महिलेला अंभोरा येथील गावकèयांनी सहानुभूतीची वागणूक दिली.प्रवासी निवाèयाला लागून असलेल्या छोटेसे चहा दुकान चालविणारे शाहबाज सलीमुद्दीन शेख यांनी वर्षभर तिला दिवसाचे जेवण घातले.तर रात्री ही महिला गावातील मंदिरात जाऊन राहायची. तिथे गावातील सिद्धार्थ वंजारी व इतर गावकèयांनी तिला रात्रीचे जेवण देण्याचे काम केले.त्यातच अभियंते वासुदेव रामटेककर यांनी घेतलेल्या पुढाकाराने तिला असहाय स्थितीपासून सुटका मिळाली.त्यापूर्वी ही त्यांनी विविध ठिकाणी फिरत असलेल्या वेडसर महिलांना अशाचप्रकारे मदत केली आहे.२ महिलांचे कुटुंबीय शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.या प्रकरणात त्वरित दखल देऊन २४ तासाच्या आत पीडित महिलेस पूर्ण साहाय्य पुरविल्याबद्दल पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांचे विशेष आभारही रामटेककरांनी मानले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...