कोंढा गावातील पुरुषाचे घराजवळच्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. दोघे ही विवाहीत आहेत. सदर महिलेला २ मुले आहेत. या संबंधाबद्दल गावात अनेक दिवसांपासून चर्चा होती. गावातील काही लोकांनी त्या दोघांना समजावले होते. तरीही अनैतिक संबंध ठेवणारा पुरुष म्हणजे रामकृष्ण कुरंजेकर याच्या घरी महिला आली. त्या दोघांना पती-पत्नीप्रमाणे राहायचे आहे, अशी म्हणाली. त्यामुळे रामकृष्णच्या घरात वाद झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रामकृष्ण आणि सदर महिलेस रिक्षात बसवून गावात धिंड काढली. त्यानंतर त्या दोघांना गावच्या पोलीस पाटलांकडे नेण्यात आले. तेथे गावकऱ्यांकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान गावकऱयांकडून घटनेचा विरोध करण्यात आला नाही. त्यांनी त्याचे चित्रीकरण करुन सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आले. उलट मी कोणताही गुन्हा केला नाही. आम्हाला दोघांना सोबत राहायचे आहे, असे रामकृष्णचे म्हणने आहे. रामकृष्णाने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment