Sunday 30 December 2018

गडचिरोलीत पोलिसांसाठी आता गोंडी, माडिया भाषेची परीक्षा




गडचिरोली,दि.30 : पोलिस भरतीसाठी गडचिरोली जिल्हा पोलिस दलात भरती नियमांत बदल करण्यात आले आहेत. 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या पोलिस भरतीत केवळ जिल्ह्यातील उमेदवारांनाच संधी देण्यात येणार असून या भरतीत गोंडी, माडिया भाषेची परीक्षा राहणार आहे.
गृह विभागाने 22 मार्च 2018 रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिस शिपाई नियम 2011 नुसार भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. पोलिस भरतीसाठी आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यातील उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदारांचा वास्तव्याचा दाखला जोडणे आवश्‍यक आहे. तसेच उमेदवाराला जिल्ह्याबाहेर बदली देण्यात येणार नाही. जिल्हा पोलिस दलात राज्य शासनाच्या धोरणानुसार 2019 मध्ये पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या पोलिस शिपाई पदाची भरती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक व शारीरिक पात्रतेत पात्र असलेल्या पोलिस भरतीच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने पोलिस भरतीमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...