गडचिरोली,दि.1- पीपल्स गोरील्ला आर्मीच्या वतीने पाळण्यात येणाऱ्या नक्षल सप्ताहाला सुरवात झाली असून सप्ताहाच्या पहिल्याच दिवसी नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालायला सुरवात केल्याचे वृत समोर येत आहे. आलापल्ली तालुक्यांतर्गत येणाऱ्या वटेपल्ली ते गट्टेपल्ली रस्ताबांधकामावरील 10 जेसीबी आणि 5 ट्रॅक्टरसह अन्य साहित्याची जाळपोळ काल मध्यरात्री केल्याचे सांगण्यात येत आहे.
आजपासून पीपल्स गोरिल्ला आर्मीचा विशेष नक्षली सप्ताहाला सुरवात झाली आहे. परिणामी, गडचिरोली पोलिसांनी सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. असे असताना आलापल्ली तालुक्यातील सुद्धा वटेपल्ली ते गट्टेपली या रस्त्याचे बांधकाम करण्याऱ्या कंत्राटदाराने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरू ठेवले होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास नक्षल्यांना तेथे उपस्थित असलेल्या मजूरांना बंदिस्त करून कामावरील 10 जेसीबी आणि 5 ट्रॅक्टरसह अन्य साहित्याची आग लावून जाळपोल केली. यामुळे संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस पथक घटनास्थळाकडे रवाना झाले असून सत्य परिस्थिती तपासांती समोर येईल. दरम्यान, संबंधित कंत्राटदाराने पोलिसांच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले असते तर घटना टाळता येऊ शकली असती, अशी चर्चा आहे.
No comments:
Post a Comment