Saturday, 1 December 2018

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन



हॉस्टन,दि.01 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. 
जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या निधनाने अमेरिकेने एक मोठा राजकीय नेता गमावला आहे. जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे अमेरिकेचे 41वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी 1989 ते 1993 या काळात राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी त्यांच्याकडे आठ वर्षे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी होती. तसेच, शीतयुद्ध संपुष्टात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांची पत्नी बारबरा बुश यांचे ९२व्या वर्षी निधन झाले होते.    
याचबरोबर, अमेरिकेचे 43 वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे वडील होते.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...