Wednesday, 26 December 2018

देवरी येथे वीज कामगारांची द्वारसभा


देवरी,दि.26- वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बुधवारी (दि.26) महावितरणच्या  देवरी येथील विभागीय कार्यालयासमोर एका द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला वीज वितरण कंपनीतील अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभेचे आयोजन करणे. येत्या 1 तारखेला प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावणे आणि 3 तारखेला स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मागण्याचे निवेदन देणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
या कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत      
महापारेषण कंपनीत स्टाफ सेटअप लागू करण्यापूर्वी मंजूर पदे भरणे,महावितरणची प्रस्तावित पुनर्रचना कर्मचारी संघटनांच्या सूचनांसह अंमलात आणणे, विजवितरणातील खाजगीकरण बंद करणे, मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभाग फ्रन्चायशी तत्वावर खाजगी भांडवलदारांना देण्याची प्रक्रिया त्वरीत थांबवणे, लघु जलविद्युत निर्मिती केंद्रे शासनाने अधिग्रहीत न करता महानिर्मितीकडेच ठेवणे, महानिर्मितीचे 210 मेगावॅटचे संच कोणत्याही स्थितीत बंद करु नयेत, मंञीमंडळ समितीने मान्य केलेली तिन्ही कंपन्या साठीची जुनी पेंन्शन योजना त्वरीत लागू करणे,रिक्त पदे भरणे,बदली धोरण राबवण्यापूर्वी संघटनांशी चर्चा करणे,कंञाटी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी सामावून घेणे,समान काम-समान वेतन या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...