Monday, 24 December 2018

सामाजिक नैतिकता जपण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करा- गोमती तितराम

देवरी,दि.24- समाजामध्ये दुसऱ्यांच्या चुकांकडे बोट दाखविण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होत आहे. मात्र, स्वतःमधील दोषांवर पांघरून सोईस्कर रीत्या घातले जाते. हे समाजविकासामध्ये बाधक ठरते. म्हणून प्रत्येकाने सामाजिक नैतिकता जपण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली पाहिजे. असे केल्याने समाजहित मोठ्याप्रमाणावर वाढीस लागेल, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य गोमती तितराम यांनी केले.
त्या देवरी तालुक्यातील गणूटोला येथे गेल्या शुक्रवारी (दि.21) श्री दत्त जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी आयोजित रक्तदान शइबिराचे उद्घाटन आंभारा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक शर्मा यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीच्या माजी सभापती सुनंदाताई नरेटी, सोनूजी नेताम, गिरधारी कडसाय, प.पु.फुलेश्वर दादा दर्यापुरकर, कमलदास, दयारामजी तेलासी, सितारामजी नरेटी, लालबहाद्दूर कलामे, यदूजी बक्चोरिया, राजूजी अठभैया,रंजीतजी कासम, चंद्रपालजी ऊईके आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 33 लोकांनी रक्तदान केले. दरम्यान, दोन जोडप्यांचे सामुहिक शुभमंगल सुद्धा यावेळी उरकण्यात आले.रात्री प.पु.प.म.श्री संतोषमुनी शास्त्री श्री क्षेत्र सुकडी/डाकराम यांचे भजन-प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन लोकनाथ तितराम यांनी केले. उपस्थितांचे आभार कुणाल उईके यांनी मानले. यावेळी परिसरातील महानुभाव पंथाने अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...