गोंदिया,दि.16 : देवरी तालुक्यातील शिलापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत चेतन उईके या कर्तव्यनिष्ठ शिक्षक आणि फावल्या वेळात समाजाच्या मुलभूत हक्कांकरिता झटणाऱ्या शिक्षकाला जिल्हा परिषदेने ५ डिसेंबर रोजी निलंबीत करण्यात आले.
देवरी येथील समाजाच्या कार्यक्रमात आणि सालेकसा येथील शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे कारण निलंबनाकरिता दाखविण्यात आले आहे. सुटीच्या दिवशी सामाजिक काम करणे गैर नाही. मग एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्यांना निलंबीत करण्यात आल्यामुळे ओबीसी संघर्ष कृती समिती त्या शिक्षकाच्या बचावाकरिता मैदानात उतरली आहे. निलंबनाच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात यावी. चेतन उईके या आदिवासी समाजसेवकाच्या निलंबनाकरिता गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि सीईओ यांच्यावर अहवाल पाठविण्याकरिता कोणत्या नेत्याचा दबाव होता तसेच तसेच चेतन उईके यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, या मागण्यांना घेवून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शनिवारी(ता.१५) निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,मनोज मेंढे, शिशीर कटरे, कैलाश भेलावे, गौरव बिसेन, रवीकांत भांडारकर, मनोज डोये, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले, हरीष ब्राम्हणकर, श्री बनोटे, राजेश नागरीकर आदींचा समावेश होता.
No comments:
Post a Comment