Wednesday 26 December 2018

खजरी येथे रस्ता सुरक्षा विषयावर जनजागृती शिबीर

उपस्थितांना मार्गदर्शन करताना सपोनि पवार आणि उपस्थित मान्यवर
गोंदिया.दि.26- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत डोंगारगाव येथील महामार्ग पोलिस मदत केंद्रच्या वतीने सडक अर्जूनी तालुक्यातील खजरी येथे वाहतुक नियम आणि रस्ता सुरक्षा या विषयी एक दिवसीय शिबीराचे आज बुधवारी (दि.26) आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
 खजरीच्या ग्रामपंचायत कार्यालयात

आयोजित या शिबिराचे अध्यक्षस्थानी सरपंच सत्यशिला गायकवाड ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नरेंद्र दिहारी, महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस पाटील इंद्रराज राऊत,फौजदार कावळे, ग्रामसेवक जी. आर. भेलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाहनांवर रिफ्लेक्टर लावताना पोलिस कर्मचारी
यावेळी पोलिस निरीक्षक पवार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे उपस्थितांना उदाहरणासह पटवून दिले. वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन केले तर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर खाली आणता येणे सहज शक्य आहे. यामुळे अनेकांचे कुटुंब उद्धस्त होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष देऊन रस्ता ओलांडणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे, लहान मुलांना वाहन चालविण्यास न देणे आदी गोष्टींवर लक्ष दिल्यास अपघातांचे प्रमाणात घट आणणे आपल्या हातात आहे. आपल्या जीवाची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
या शिबीराच्या यशस्वितेसाठी हवालदार इश्वर, भोवते, भगत, शिपाई मेश्राम आदींनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...