गोंदिया,दि.०२ : लोकांनी स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करून आपले गाव स्वच्छ समृद्ध व हागणदारीमुक्त ठेवण्याचे आवाहन करणाèया पाणी व स्वच्छता विभागाच्या जनजागृतीपर स्वच्छता चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्ह्यात रवाना करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सीमा मडावी,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाशमी,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था बेलापूर मुंबईमार्फेत गोंदिया जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायतीत चित्ररथ फिरणार आहे. शौचालयाचा वापर, त्याची देखभाल दुरुस्ती,स्वच्छतेच्या सवयी,हात धुण्याची पद्धत,शास्वत स्वच्छता तथा हागणदारीमुक्त गाव,शौचालय बांधण्याची पद्धती, स्वच्छतेमुळे होणाèया आजारांची माहिती सुध्दा या चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी गावकèयांनी शौचालयाचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी केले.चित्ररथातून दिला जाणारा संदेश
आपल्या सर्वांसाठी मौलिक राहणार आहे.स्वच्छता हे आपले आद्य कर्तव्य असून प्रत्येक भारतीय नागरिकांने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जनजागृतीवर भर देत नागरिकांना चित्ररथाच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंत मडावी,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर वाळके,शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment