नांदेड,दि.29ः- लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने ‘लॉयन्सचा डबा’ रयत रुग्णालय नांदेड येथे रविवार दि.30डिसेंबर रोजी दुपारी 11.30 वाजता जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सुरु होणार असल्याची माहिती लॉयन्स सेंट्रल चे अध्यक्ष लॉ.डॉ. देवेंद्र पालीवाल, सचिव लॉ.डॉ. सागर मापारे,कोषाध्यक्ष लॉ.लालचंद आसवानी व प्रोजेक्ट चेअरमन लॉ.अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स प्रांतपाल लॉ. डॉ. संजय वोरा हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून लॉयन्स जीएसटी कॉर्डिनेटर लॉ. दिलीप मोदी, रयत रुग्णालय अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे हे उपस्थित राहणार आहेत. वर्षभरासाठी दररोज दहा डबे देण्याची घोषणा करणारे लॉ.आशिष भंडारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर,लॉ.संजय अग्रवाल,लॉ.चद्रकांत अलकटवार ,लॉ. कंवलजीतसिंघ यांनी सहकार्य केले आहे.
रयत रुग्णालयात बाहेर गावाहून आलेल्या गरीब रुग्णांना दररोज डबे देण्यात येणार आहेत. डब्यामध्ये पाच चपाती, भाजी,वरण-भात चा समावेश असणार आहे. लॉयन्सचा डबा’ चा स्वयंसेवक रयत रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून गरीब रुग्णांची माहिती घेईल. ज्यांच्या वतीने डबा देण्यात येणार असेल त्याचे नाव असणारे कार्ड डब्या सोबत रुग्णाना देण्यात येईल. दररोज ज्या रुग्णांना डबे देण्यात आले व ज्यांच्यातर्फे डबे देण्यात आले याची नोंदवहीत नोंद ठेवण्यात येईल. या उपक्रमात कोणत्याही दानशूर व्यक्ती ला सहभाग घेता येईल. एखाद्या शुभ प्रसंगी अथवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किमान तीस डबे देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लॉयन्स सेंट्रलच्या कोणत्याही सदस्यांसी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे
No comments:
Post a Comment