Sunday, 2 December 2018

संविधान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत संविधान दिन मैत्री पर्व साजरा

गोंदिया,दि.०२:- भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट समता,स्वतंत्रता,बंधुता, आणि न्याय या सारख्या मानवीय मूल्यांना घेऊन ओबीसी, एससी, एसटी,अल्पसंख्याक वर्गातील विविध ३५ संघटनांच्या संविधान बचाव कृती समितीच्या वतीने संविधान जनजागृती व भाईचारा कायम करण्याच्या उद्देशाने ‘संविधान गौरव दिन मैत्री पर्व‘ कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालयाजवळील डॉ. आंबेडकर प्रतिमा चौकात उत्साहात साजरा करण्यात आला.
चार सत्रामध्ये आयोजित या कार्यक्रमात ओबीसींसह ३५ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.‘मैत्री पर्व‘ कार्यक्रमांतर्गत चार सत्रांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन पार पडले.पहिल्या सत्रात समता सैनिक दलाच्यावतीने संविधान सन्मानार्थ सलामी देऊन परेडचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन कमांडर राजहंस चौरे यांनी केले.दुसèया सत्रात महिलांचे हक्क अधिकार विषयाला घेऊन चर्चासत्र घेण्यात आले.या महिला चर्चासत्रामध्ये प्रा.सविता बेदरकर,डॉ..सुवर्णा हुबेकर,वर्धेवरुन आलेल्या स्मिता उमरे,आरती चवारे,कृती संघ संरक्षक पोर्णिमाताई नागदेवे,संजूताई खोब्रागडे,सवित्रीमाई फुले संघटनेच्या समता गणवीर,वैशाली खोब्रागडे,भारतीय बौद्ध महासभेच्या रश्मी राऊत प्रमुख्याने उपस्थित होत्या.या सत्राचे संचालन संगीत साखरे व एकता मेश्राम यांनी केले.तिसèया सत्रामध्ये संविधान परिचर्चा व युवा सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ,मूवमेंट फॉर प्रोग्रेसिव आर्गेनाईजेशन, एसएसडी ग्रुपचे शुभम कांबळे आणि फ़िरदौस खान हे सहभागी झाले होते.चर्चासत्राचे प्रास्ताविक व मार्गदर्शन आंबेडकरी संस्कार केंद्राचे संचालक महेंद्र कठाने,ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बहेकार यांनी केले.या कार्यक्रमाला अतिथी म्हणून पुरुषोत्तम मोदी,युवा परिवर्तन संघाचे शुद्धोधन शहारे,विदर्भ आंदोलनाचे गुरमित चावला, एम्बसचे यशवंत रामटेके,मातंग समाज संघाचे गवळी,युवा बहुजन मंचचे रवी भांडारकर,संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचे क्रांती ब्राम्हणकर,युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,जीवनलाल शरणागत,राकेश टेंभरे,आदिवासी संघटनेचे अनिल वट्टी,परेश दुरुगवार,भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव बंसोड़,ब्लड बैंक अधिकारी अनिल गोंडाने,विश्वजित बागडे, चेतन मेश्राम आदी उपस्थित होते.तर शेवटच्या चौथ्या सत्रात देशभक्तिपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर वरून आलेले गिनिज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलेले गायक सारिपुत्र वानखेड़े यांनी आपल्या सुमधुर वाणीने प्रबोधन केले.अवंतीबाई लोधी महासभेचे शिव नागपुरे यांनी संचालन केले.या कार्यक्रमात स्थानिक मुले,मुली- विद्याथ्र्यांनी भाग घेतला.त्यामध्ये अलिशा,प्राची,अंजली,समृद्धी,प्रज्वल,रक्षक, आदित्य यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले.कार्यक्रम संयोजक अतुल सतदेवे आणि पोर्णिमाताई नागदेवे यांनी देशभक्ती गीत सादर केले.उपस्थितांचे आभार गुरमित चावला यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...