Sunday 28 October 2018

ओबीसींना मूलभूत अधिकारासाठी संघटित होण्याशिवाय पर्याय नाही-बबलू कटरे

गोंदिया,दि.28- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व शास्त्रीवार्ड शाखेच्यावतीने येथील वॉर्डातील डॉ. रुपसेन बघेले यांच्या निवासस्थानासमोर शरद पोर्णिमा उत्सव व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (दि.२५) करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ओबीसी कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते.
मार्गदर्शक म्हणून महासचिव मनोज मेंढे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, प्रा. रामलाल गहाणे, शास्त्री वार्ड संघटनेचे अध्यक्ष खुशाल कटरे, नगरसेविका मालती कापसे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सविता बेदरकर, एल.यू. खोब्रागडे, एस.यू. वंंजारी, डॉ. रुपसेन बघेले, सqवधान बचाव समितीचे अतुल सतदेवे, गुरमितqसह चावला, माजी नगरसेवक सुनिल भरणे, युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, प्रा.गजानन तरोणे, राध्येशाम करंजेकर, प्राचार्य बी.डब्लू.कटरे, गीता मदनकर, विमलताई कटरे, राजेश्वरी रहागंडाले, निर्मलाबाई बिसने, सौ.आशू रहागंडाले,राजेश कापसे, वाय.डी. पटले, पंकज गौतम, डॉ.पारधी, मोहसीन खान आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष बबलू कटरे म्हणाले की आम्ही आमच्या मूलभूत अधिकार ज्या राज्यघटनेपासून मिळाले त्या राज्यघटनेच्या रक्षणासाठी आणि आपल्या संविधानिक अधिकारासाठी लढण्यास तयार होण्याऐवजी फालतूच्या इतर गोष्टीत आपला वेळ वाया घालवू लागलो आहे.या देशातील मूठभर समाज आमच्या ओबीसी समाजातील महिला व युवकांच्या मेंदुला नासवण्याचे काम करीत त्यांना सqवंधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.जोपर्यंत आम्ही आपल्या अधिकार व हक्कासाठी जागृत होणार नाही, तोपर्यंत आपला विकास शक्य नाही.ओबीसीतील काही शिक्षित नोकरदार वर्ग मनुवाद्यांच्या विचारांना बळी पडत आर्थिक आरक्षणाची मागणी करीत आहेत, त्यांनी आर्थिक आरक्षणाची मागणी करण्यापुर्वी आपल्या नोकरीचे वेतन आणि एका व्यापाèयाला मासिक होत असलेल्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ बसवून घ्यावे.सोबतच आयकर विभागाकडे आपण किती कर भरतो आणि तो व्यापारी किती भरतो याचा अभ्यास केल्यानंतर आर्थिक आरक्षणावर बोलावे असे विचार मांडले.

भारतीय राज्यघटनेच्या मुळ गाभ्याला कुठलेही सरकार हात लावू शकत नाही.कारण ही राज्यघटनाच लोकशाहीवर आधारीत आहे.ज्यादिवशी या देशाची लोकशाही संपुष्ठात येईल त्याचदिवशी राज्यघटनेचा मूळ गाभा बदलू शकतो.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना ३४० व्या कलमानव्ये सामाजिक, शैक्षणिक व इतर मूलभूत अधिकार राज्यघटनेत दिले आहेत. परंतु त्या कलमाची अमलबजावणी गेल्या ७० वर्षात काँग्रेस असो की भाजप या कुठल्याही पक्षाने केलेले नाही हेच वास्तव्य आपणास विसरता येणार नाही, त्यामुळे ओबीसी समाजातील शिक्षितांनी आपला थोडा वेळ समाजाला जागृत करण्यासाठी सदपयोगी घालून कर्मकांडातून बाहेर येत मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सविताताई बेदरकर यांनी qहदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत मुलासारखेच मुलीलाही समान वागणूक देण्याचे आवाहन केले.प्रा.रामलाल गहाणे यांनी आम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी सकाळपासून तयारी करुन त्या कार्यक्रमात हजेरी लावतो फेटे घालून नाचतो. परंतु ज्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिले त्या राज्यघटनेच्या अधिकारासाठी आम्हाला मात्र अशा कार्यक्रमात यायला वेळ राहत हीच खरी या समाजाची शोकांतिका असून महिलाच आपल्या मुलांच्या भविष्याचे वाटोळे मनुवाद्यांच्या सोबतीला जाऊन करीत असल्याचे विचार व्यक्त केले.मनोज मेंढे यांनीही ओबीसी समाजाच्या युवकांना संघटित होण्याचे आवाहन केले. सुनिल भरणे, डॉ.रुपसेन बघेले, खेमेंद्र कटरे यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व पत्रकार खेमेंद्र कटरे यांना ग.त्र्य. माडखोलकर पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष प्रा.सविताताई बेदरकर, डॉ.रुपसेन बघेले, गुरमितqसह चावला यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
प्रास्तविक प्रा.संजिव रहागंडाले यांनी केले. संचालन ओबीसी संघर्ष कृती समितीचे प्रसिध्दीप्रमुख सावन डोये यांनी केले तर आभार मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष बंशीधर शहारे यांनी मानले.
आयोजनासाठी समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे, बहुजन युवा मंचचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर राहुल खोब्रागडे, संतोष वैद्य, प्रेम साठवने, केशरीचंद बिसने,संतोष चित्रीव,रुपसागर कुंभलकर,रामकृष्ण गौतम, प्रा.राणे,उमेश लांजेवार, रोहित चौधरी, ओमेंद्र पारधी, बंडू चौधरी, निलू यादव, सोनू पारधी, संजू पटले, राजू भोंगाडे, आशिष वंजारी, संदीप पाटील,रिना भोंगाडे, विना कापसे, आशा भांडारकर आqदनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...