देवरी, दि. 28- स्थानिक धूकेश्वरी मंदिर परिसरात जैन कलार समाज शाखा देवरीच्या वतीने (दि 27) कोजागिरी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी हेमचंदजी रामटेककर हे होते. यावेळी नगरसेवक यादोराव पंचमवार, नगरसेवक प्रवीण दहिकर, प्रा. डॉ. सुधीर भांडारकर, सुरेश भदाड़े, रामेश्वर मुरकुटे सर, आत्माराम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला व मुलांसाठी संगीत खूर्ची, प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
प्रास्ताविक डॉ भांडारकर यांनी केले. संचलन जागेश्वर ठवरे यांनी केले. उपस्थितांचे आभार संदीप तिडके यांनी मानले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment