Wednesday 10 October 2018

नगरपरिषदेच्या कर विभागातील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.10 : गोंदिया नगरपरिषदेच्या  कर विभागातील दोन लिपिकांना  (दि.९)  तक्रारदाराकडून घराचा कर भरणाला घेऊन १0 हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचखोर लिपिकांचे नाव अशोक गजभिये व गणेश मौजे (वरिष्ठ लिपिक) असे आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.गोंदिया नगरपरिषदेतील कर विभागाचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात विभाग अपयशी पडत आहे.
अद्यापही परिषदेची थकीत कर वसुली ७ कोटींच्या वर आहे. प्रत्येक वर्षी पालिका प्रशासनाच्यावतीने कर वसुलीसाठी जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येते. यामध्येही कर विभागातील कर्मचार्‍यांचे साटेलोटे असल्याने अनेक बडे करधारक आपले फावले करून घेतात. याच संधीचा लाभ घेत कर विभागातील लिपीक अशोक गजभिये व गणेश मौजे यांनी करवसुलीत सेटिंग करण्याच्या नावावर लाचेची मागणी केली.
लाच देऊन काम करण्याची इच्छा नसल्याने तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची शहनिशा करून मंगळवारला नगरपरिषद परिसरात सापडा रचण्यात आला. दरम्यान, एका झेरॉक्सच्या दुकानात तक्रारदाराकडून १0 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाने पार पाडली. यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेण्यात आले.दरम्यान तक्रारकर्त्याने माजी नगरपरिषदेचे सभापती दिलीप गोपलांनी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तक्रार दाखल करण्यास सांगितल्याने त्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...