गोंदिया ,दि.28ः-जिल्हा पोलिस घटकांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ५ पोलिस अधिकार्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी स्थानांतरण केले आहे. तसे आदेश २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून काढण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील रामनगर, गोरेगाव, आमगाव, गंगाझरी व दवनीवाडा या ५ पोलिस स्टेशनचे ठाणेदार बदलले आहेत.
जिल्हा पोलिस घटकातील आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ५ पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक यांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थानांतरण करण्यात आले आहे. रामनगरचे ठाणेदार उमेश पाटील यांचे स्थानांतरण आमगाव पो.स्टे.ला, गोरेगावचे ठाणेदार जितेंद्र बोरकर यांचे स्थानांतरण रामनगर पो.स्टे., आमगावचे ठाणेदार शशिकांत दसुरकर यांचे स्थानांतरण गोरेगाव पो.स्टे.ला, विशेष पथकाचे सपोनि शामराव काळे यांचे स्थानांतरण गंगाझरी, नियंत्रण कक्षाचे सपोनि गणेश धुमाळ यांचे स्थानांतरण दवनीवाडा, दवनीवाडाचे सपोनि दिपक जाधव यांचे स्थानांतरण नियंत्रण कक्ष गोंदिया येथे करण्यात आले आहे.
२६ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात तात्पुरत्या स्वरुपात उपरोक्त अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित पोलिस स्टेशनला त्वरित त्यांनी पदग्रहण करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment