Monday, 15 October 2018

ब्लॉसम स्कुल मध्ये 10वा रास गरबा उत्साहात साजरा

देवरी:14 देवरी येथील लोकप्रिय आईएसओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे 10 व्या रास गरबा व दांडियाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यावेळी मिसेल्स रुबेला लसीकरणाच्या प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निर्मल अग्रवाल सचिव, डॉ. सुजित टेटे प्राचार्य, दिनेश भेलावे परीक्षक , कमल अग्रवाल, श्रुती अग्रवाल, हजारोच्या संख्येत पालक, सर्व विध्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी रास गरबा च्या माध्यमातून रुबेल्ला लसीकरणाच्या प्रचार केला. अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी आपल्या रास गरबा चे नृत्य सादर केले. पथनाट्य सादर करून मिसेल्स रुबेलाचे  जण जागृती करण्यात आली.
पालकांनी मोठ्या संख्येत स्पर्धे मध्ये भाग घेतला होता.शिक्षक आणि पालकांनी एकत्रित गरबा नृत्य साजरा करून आनंदोत्सव साजरा केला.
मोठ्या उत्साहात रास गरबाचे 10 वे वर्ष साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक आणि सर्व शालेय विभागांनी मोलाची कामगिरी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...