Sunday, 14 October 2018

मनरेगा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आ.पुराम

देवरी,दि.14ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा)योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी संघटनेची 13 आॅक्टोबरला गोंदिया जिल्हास्तरीय सभा घेऊन संघटनेच्या अध्यक्षपदी देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम यांची निवड करण्यात आली. 
उपाध्यक्षपदी तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहागंडाले तर मार्गदर्शक म्हणून विनोद अग्रवाल यांची निवड करण्यात आली. संघटनेत सचिव डी.जी.ठाकरे, सह सचिव मनोज बोपचे, कोषाध्यक्ष डी. जे. लिल्हारे, सल्लागार रमेश चुटे व डॉ.लक्ष्मण भगत तर सदस्यांमध्ये डी.जी. रहागंडाले, मधुकर पटले, विजय पटले, मनुश्वर चौधरी, पुरुषोत्तम बावनकर, एल.डी.चव्हाण, एम.सी.पटले. पंकज आंबेडारे व महेंद्र साखरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कंत्राटी कर्मचारी संघटनेवर राजकीय पक्षाचे म्हणजे भाजपचे वर्चस्व दिसून येत असल्याने ही भाजपची एक शाखाच भासविण्याचा प्रयत्न कंत्राटी कर्मचारी वर्गांनी केला की काय असे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...