देवरी,दि.20- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून शालेय विद्यार्थ्याना स्कूलबॅगचे वाटप गेल्या सोमवारी (दि.15) करण्यात आले.
या बॅग वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुल्लाचे सरपंच कृपासागर गौपाले हे होते. यावेळी उपसरपंच सीमा नाईक, सदस्यांमध्ये वंजारी, छन्नू कांबळे,संगीता नागोसे, चंदन घासले, राजू खोटेले, नेतराम वघरे,रत्नकला नंदागवळी, रवींद्र आंबागडे,ग्रामसेवक किशोर वैष्णव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवाने आणि सदस्य, मुल्ला शाळेचे मुख्याध्यापक चांदेवार, हेटीटोला शाळेचे मुख्याध्यापक राणे, सर्व शिक्षक आणि पालक वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment