Monday, 3 October 2016

विना अनुदानीत शिक्षकांचा मोर्चा, शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार मोर्चाचे नेतृत्व

औरंगाबाद दि. 3- शिक्षणमंत्र्यांच्या सुलतानशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी तथा सर्व विनाअनुदानीत शाळा तुकड्यांना प्रचलित टप्प्यानुसार अनुदान द्या, या मागणीसाठी ४ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विना अनुदानित कृती समितिने “अनुदान हक्क मोर्चा “आयोजित केला आहे. मोर्चाचे नेतृत्व शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार आहे.

भुजबळांच्या समर्थनात नाशिकात एकवटले ओबीसी

नाशिक,दि.3: छगन भुजबळांना लवकरात लवकर सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला. याशिवाय मुंडेंना संपवलं, आता भुजबळांना संपवू देणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ समर्थकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे.संपूर्ण ओबीसी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. 

Sunday, 2 October 2016

पासष्ठ हजार कोटींचे काळे धन बाहेर

पेंचमध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू

नागपूर,दि.2 : मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार २९ सप्टेंबर रोजी रामपुरी बिटातील कक्ष क्रमांक १३९९ येथे या बछड्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर मध्य प्रदेश वन अधिकार्‍यांनी ३0 सप्टेंबर रोजी त्या बछड्याचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Saturday, 1 October 2016

लखलखत्या तेजात माताराणीचे आगमन


आज अश्विन शुक्ल प्रतिपदा. लखलखत्या तेजोमय वातावरणात माताराणीचे आगमन झाले. राष्ट्रीय महामार्ग 6 शेजारी देवरी येथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेली व आदिवासीचे आराध्य असलेली मॉ धुकेश्वरी मंदीर परिसर असा रौशनाईने न्हाऊन गेला. अगदी पहिल्याच दिवसी दर्शनासाठी मातेच्या भक्तांनी केलेल्या गर्दीने परिसर फुलून गेला होता.- सुरेश भदाडे

वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

मुंबई, दि. १ – मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल छापण्यात आलेल्या व्यंगचित्रावरून जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे मला खूप दुख: झालं. मात्र ते केवळ एक व्यंगचित्र होते, त्याद्वारे कोणालाही दुखावण्याचा व अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, असं सागंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे.

शुभांगी मुनघाटे सेट परीक्षा उत्तीर्ण

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...