Tuesday, 30 June 2020
देवरीच्या जिल्हा परिषद शाळेचे सुयश
Wednesday, 24 June 2020
Saturday, 20 June 2020
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे, परीक्षेबाबत कोविड-१९चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय
![]() |
उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत |
मुंबई, दि.20 : विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड-19 प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबूक पेज लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाहीर केले. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
श्री. सामंत यांनी सांगितले, काल राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोविड -19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंतिम वर्षाच्या /अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात विद्यापीठाच्या परीक्षेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा द्यायच्या आहेत किंवा परीक्षा द्यायच्या नाहीत याबाबत विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे आपले मत कळवावे. परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षा द्यायची नाही त्यांना योग्य त्या सुत्रानुसार पदवी प्राप्त होईल आणि ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्याबाबत कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षेबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
अव्यवसायिक (पारंपरिक) अभ्यासक्
अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण, अध्यापनशास्त्र असे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी संबंधित अभ्यासक्रमासाठीच्या शिखर संस्थेची परवानगी घेण्यात येणार आहे. तसेच येत्या चार दिवसात बॅकलॉक आणि एटीकेटी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंशी चर्चा करून निर्णय घेण्यात घेण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे, असेही श्री सामंत यांनी संगितले.
Friday, 19 June 2020
मुख्यालयाबाहेर नौकरी न करणाऱ्या पण पदोन्नती मिळालेल्या त्या कर्मचाऱ्यावर सीईओंची मेहरबानी?
Thursday, 18 June 2020
कोरोनाच्या नावावर पीडब्लूडीने गटर व शौचालय दुरुस्तीसाठी खर्च केले कोटी
Tuesday, 16 June 2020
Wednesday, 10 June 2020
Tuesday, 9 June 2020
Thursday, 4 June 2020
नक्षलग्रस्त दुर्गम मुरकुटडोह-दंडारी पक्क्या रस्त्याने होणार कनेक्ट

दरेकसा ग्रामपंचायतीत दरेकसा सोबतच टेकाटोला आणि मुरकुडोह १, मुरकुडोह २, मुरकुडोह ३, दंडारी या पाच गावांचा समावेश आहे. दरेकसा वगळता या पाचही गावांची एकूण लोकसंख्या हजाराच्या आसपास. ग्रामपंचायतीत जायचे असेल, तर १०-१२ किमी अंतरावरच्या दरेकसाला पायवाट किंवा पांदण रस्त्यानेच जावे लागायचे.आत्ता मात्र नक्षलग्रस्त भागातील विशेष कृती आराखड्याला महत्व देत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतून धनेगाव- टेकाटोला-दलदलकुही-मुरकुटडोह १ पर्यंत १५.५ किमीचा डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे.यात ४.५किमीचे काम मोठ्या गतीने पुर्ण करण्यात आले असून धनेगाव ते दंडारी पर्यंतंचा ११ किमीच्या रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरु आहे.जंगलातून जात असलेल्या या रस्तामुळे वनविभागानेही आपली समंती विशेषबाब म्हणून तत्कालीन सरकारच्या काळात दिली हे विशेष.पहाडांना फोडून आणि स्थानिक जनतेला हवा तसा रस्ता त्यांच्या मागणीनुसारच करण्यात येत आहे.मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची सीमा एका छोट्याशा नाल्याने विभाजीत झाली असून याच भागात नक्षल्यांचा मोठा वावर असतो.तो म्हणजे रेस्ट झोन करीता.
पालकमंत्री आले…बैठकीनंतर पाल्यांशी चर्चा सोडून,बंगल्यावर गेले…
Wednesday, 3 June 2020
Tuesday, 2 June 2020
दुचाकी गाडीवर एका वृत्तपत्रचा लोगो वापरुन शिक्षकाने केली दारु तस्करी
Monday, 1 June 2020
राज्य सरकारकडून लॉकडाउन-5 बाबत नवीन नियमावली जाहीर; शॉपिंग मॉल, हॉटेल्स, धार्मिक स्थळे अद्याप बंदच
- 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक.
- कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार.
- सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी.
- सार्वजनिक मैदानेही खुली होणार.
- समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी.
- धार्मिक स्थळे बंदच राहणार.
- स्डेडिअम बंदच राहणार.
- फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश.
- लांबच्या प्रवासावर बंदी.
- शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार.
- मेट्रो बंदच राहणार.
- केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.
- सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल, बंद राहतील.
- सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील.
- शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्तरॉ बंदच राहतील.
- सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
- टप्पा-1 : 8 जूनपासून मॉल-रेस्तराँ सुरू होणारधार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्तराँ, मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉस्पिटॅलिटी सेवा 8 जूनपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठीची नियमावली केद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच जारी करणार आहे.टप्पा-2 : शाळा-कॉलेजबाबत जुलैत निर्णयराज्यांशी सल्लामसलतीनंतर शाळा-कॉलेज, कोचिंग, शिक्षण संस्था, प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत जुलैमध्ये निर्णय घेण्यात येईल. संस्था, पालक आणि त्यांच्यांशी संबंधित लोकांचाही सल्ला घेतला जाईल. यासाठीचे नियम लवकरच जाहीर होतील.टप्पा-3 : थिएटरबाबत तारीख निश्चित नाहीस्थितीच्या आढाव्यानंतर आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, चित्रपटगृहे, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन स्थळे, प्रेक्षागृहे, खेळ, राजकीय मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम, गर्दी असणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल. अद्याप तारीख निश्चित नाही.> 1 जूनपासून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पासची गरज नाही, संचारबंदी रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंतसंपूर्ण देशात संचारबंदीची वेळ घटली. आता रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी. मॉर्निंग वॉकला जाता येईल. ६५ वर्षांवरील वृद्ध, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, १० वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांना घरातच राहण्याचा सल्ला.> राज्यात, राज्याबाहेर लोकांच्या ये-जा करण्यावर बंदी नाही.राज्यांत येणारे व राज्यांतून जाणारे लोक आणि साहित्यावर राज्याला बंदी घालता येणार नाही. वाहतुकीसाठी लोकांना पासची किंवा परवानगीची गरज लागणार नाही. मात्र, ही सवलत संबंधित राज्याच्या नियमांवर अवलंबून राहील.> सीमेवरील राज्यांना शेजारी देशांत साहित्य वाहतुकीवर बंदी नाही.शेजारील देशांशी करारानुसार ज्या मालवाहू वाहनांना सीमापार जायचे असेल तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या वाहनांना रोखता येणार नाही.> वृद्ध आणि मुलांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला.65 वर्षांवरील वृद्ध, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांना घरातच राहण्याचा सल्ला.> प्रवासी रेल्वे व विमान प्रवाशांना सध्या एसओपी पाळावी लागेलपॅसेंजर रेल्वे, श्रमिक एक्स्प्रेस, देशांतर्गत प्रवासी विमान, विदेशात अडकलेले भारतीय यांना नियम पालन करावे लागेल. नाविकांची ये-जा एसओपीनुसार चालेल.> गर्दीचे समारंभ नकोत, विवाह सोहळ्यात 50, अंत्यविधीसाठी 20 लोकच असतील.गर्दीच्या समारंभांवर बंदी राहील. विवाह सोहळ्यात 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोक जमण्यास परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दारू पिणे, पान-गुटखा, तंबाखू खाणे यावर बंदी राहील.> घरातूनच काम करण्यास प्रोत्साहन देण्याचा सल्ला.गृह मंत्रालयानुसार, वर्क फ्रॉम होमला चालना दिली जाईल. कार्यालये व दुकानांच्या वेळा वेगळ्या राहतील. कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझेशनची व्यवस्था असावी.> कंटेनमेंट झोन राज्य ठरवेल, येथे फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा.कंटेनमेंट झोनची निश्चिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांनुसार जिल्हाधिकारी करतील. कंटेनमेंट झाेनमध्ये अत्यावश्यक सेवांना मुभा राहील. स्थिती नियंत्रणासाठी इतर भागातून या भागात ये-जा करण्यावर बंदी कडकपणे जारी राहील. या भागात काँटॅक्ट ट्रेसिंग जास्त प्रमाणात होईल आणि प्रत्येक घरी तपासणी होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वाटले तर ते कंटेनमेंट झोनच्या बाहेरील कारभारावर बंदी आणू शकतात.
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...