Friday, 24 July 2020

जिप शांळाचे विद्युत बील ग्रामपंचायतींनी भरावे- शिक्षक संघाची मागणी

देवरी,दि.24 - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे विद्युत बील हे ग्रामपंचायतींनी भरावे, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या देवरी शाखेने  स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या कोविड-19 ने थैमान घातले असल्याने ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. या कक्षामध्ये बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे शाळेमध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी, शाळेच्या विद्यूत बीलाचा आकडा वाढला. हे बील शाळांना मिळणाऱ्या अपुऱ्या अनुदानामुळे शालेय प्रशासनाला भरणे शक्य नाही. यामुळे सदप विद्युत बिलाचा भरणा ग्राम पंचायतीला मिळणाऱ्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला करण्याची मागणी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. हे विद्युत बिल वेळेच्या आत भरणा न केल्यास शालेय प्रशासनाला ऑनलाइन कामे करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संघाच्या या मागणीला गटविकास अधिकारी मोडक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघाचे तालुका नेते एस एच गभणे, रमेश ऊइके, सत्यवान गजभिये, आदेश धारगावे,जीवन आकरे, निकेश सुखदेवे, जितेंद्र कोहाडकर,लोकेश मेश्राम, मनोज गेडाम,मंगल सयाम, मोरेश सुर्यवंशी, ओमप्रकाश ढवळे,राजेश रामटेके आदींचा समावेश होता.

Tuesday, 21 July 2020

पोलीस शिपायाची अल्पवयीन मुलास मारहाण

विनोद सुरसावत
ककोडी,दि.२१: चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ककोडी येथील एका अल्पवयीन मुलास पोलीस शिपाई रुखमोडे यांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना सोमवारच्य सायंकाळी घडली. दरम्यान गावकèयांनी पोलीस शिपायावर कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. ककोडी येथील दारु दुकानाच्या परिसरात खाद्य पदार्थ विकून आपल्या घरी परत जात असताना राजा अशोक घरसिया या मुलाला पोलीस शिपाई रुखमोडे याने वाटेत अडवून मारहाण केली. यापुर्वी ही रुखमोडे यांनी ककोडी परिसरात मारहाण केल्याचे बोलले जात आहे. रुखमोडे यांच्या या वागणुकीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर ामरहाणीची माहिती मिळताच पोलीस पाटील चंद्रपाल शहारे यांनी सदर मुलाला रुग्णालयात नेत त्याच्यावर औषधोपचार केला. औषधोपचारानंतर मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेले. मात्र तक्रार न नोंदविता पोलिसांनी मध्यस्ताच्या माध्यमातून प्रकरण शांत केले.

मगरडोह परिसरात आढळले नक्षली पत्रक

गोंदिया,दि.२१: नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली डिवीजन कमेटीच्याावतीने मगरडोह परिसरात बॅनर, पोस्टर्स लावल्याने खळबळ माजली आहे. या बॅनरमध्ये २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करीत नक्षल नेता चारु मुजूमदार व कन्हाई चॅटर्जीच्या विचारांना आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नक्षल्यांच्या स्मृती निमित्त गावात कार्यक्रम आयोजन करण्याचे आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

चिचेवाडा येथे नक्षल दमन सप्ताह साजरा

देवरी.दि.21 - नक्षल शहीद सप्ताह-2020च्या पार्श्वभूमीवर जनमानसात पोलिस प्रशासनाविषयी विश्वासाहर्ता निर्माण व्हावी
 या उद्देशाने देवरी पोलिस स्टेशन हद्दीतील चिचेवाडा येथे आज मंगळवारी (दि.21) नक्षल दमन सप्ताह गोंदिया पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला.
माओवादी संघटनेच्या वतीने संघटनेचा नेता चारू मुजूमदार याच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी 28 जुलै ते  3 ऑगस्ट या काळात नक्षल शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या काळात नक्षल चळवळीच्या माध्यमातून समाजात प्रशासनाविरुद्ध  गैरसमज आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षल संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. याशिवाय घातपाताच्या कारवाया सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो.
यासाठी प्रशासनाच्या वतीने लोकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करून शासकीय यंत्रणांच्या माध्यमातूनच विकास घडवून आणला जातो, अशी भावना  जागृत करण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या वतीने नक्षलग्रस्त भागात नक्षल दमन सप्ताह साजरा करण्यात येतो. 20 जुलै ते 26 जुलै पर्यत राबविण्यात येणाऱ्या सप्ताहाचा एक भाग म्हणून देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिचेवाडा येथे सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने शहीद रामा गावळ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद पोलिस कर्मचारी गावळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...