Tuesday, 21 July 2020

चिचेवाडा येथे नक्षल दमन सप्ताह साजरा

देवरी.दि.21 - नक्षल शहीद सप्ताह-2020च्या पार्श्वभूमीवर जनमानसात पोलिस प्रशासनाविषयी विश्वासाहर्ता निर्माण व्हावी
 या उद्देशाने देवरी पोलिस स्टेशन हद्दीतील चिचेवाडा येथे आज मंगळवारी (दि.21) नक्षल दमन सप्ताह गोंदिया पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला.
माओवादी संघटनेच्या वतीने संघटनेचा नेता चारू मुजूमदार याच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी 28 जुलै ते  3 ऑगस्ट या काळात नक्षल शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या काळात नक्षल चळवळीच्या माध्यमातून समाजात प्रशासनाविरुद्ध  गैरसमज आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षल संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. याशिवाय घातपाताच्या कारवाया सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो.
यासाठी प्रशासनाच्या वतीने लोकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करून शासकीय यंत्रणांच्या माध्यमातूनच विकास घडवून आणला जातो, अशी भावना  जागृत करण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या वतीने नक्षलग्रस्त भागात नक्षल दमन सप्ताह साजरा करण्यात येतो. 20 जुलै ते 26 जुलै पर्यत राबविण्यात येणाऱ्या सप्ताहाचा एक भाग म्हणून देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिचेवाडा येथे सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने शहीद रामा गावळ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद पोलिस कर्मचारी गावळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...