Monday 29 August 2016

साकोली येथे विदर्भवादी अॅड. अणे यांची जाहीर सभा


साकोली, 29 (berartimes.com)- विदर्भातून मताधिक्य मिळवून विविध राजकीय पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. कधी जातीच्या तर कधी धर्माच्या नावावर विदर्भवासीयांना भूलथापा देऊन आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले. मात्र, विदर्भाला सतत सावत्र वागणूक देत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला नेहमीच बगल दिली. नागपूर करारातील अनेक आश्वासने पाळल्या गेली नाहीत. आता आपल्या हक्कांसाठी आपल्या लढाईची धार तीव्र करावी लागणार आहे, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते अॅड. श्रीहरी अणे यांनी आज साकोली येथे केले.
ते स्थानिक लहरीबाबा मठ देवस्थाना आयोजित जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर विराचे सचिव नीरज खांदेवाले, संविधानेचे गाढे अभ्यासक जवादे सर, विराचे कोशाध्यक्ष सुरेंद्र पारधी, नरेंद्र पालांदूरकर, बंडू धोत्रे, छैलविहारी अग्रवाल,कमलेश भगतकर,कोडवाणी, प्रवीण भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते
 पुढे बोलताना श्री अणे म्हणाले की, विदर्भाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी राजकारण केले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी  केलेल्या नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना प्रमुख सहा आस्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आस्वासने अजूनही पाळण्यात आली नाहीत. विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. यापूर्वी वेगळ्या विदर्भसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, राजकारण केले. मात्र, ऐनवेळी या राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाला बगल दिली. अखंड महाराष्ट्रात विदर्भावर नेहमी अन्याय होत आला आहे. नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना  शासकीय, निमशासकीय  शाळा, महाविद्यालये. कार्यालयीन नोकरीसाठी 23 टक्के आरक्षण देण्याचा नियम आहे. आजवर या नियमाचे पालन झाले नाही. वेगळा विदर्भ होणे काळाची गरज आहे. वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भवासीयांचा विकास होणे शक्य नाही. यासाठी विदर्भवासीयांनी एकत्र येऊन ताकद दाखविण्याची गरज असल्याचे असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. या जाहीर सभेत साकोली तालुका बार  अशोसियसन द्वारे विदर्भ राज्य आघाडीच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिला.
.यापूर्वी स्थानिक विश्रामगृहातून अॅड.अणे यांनी बाइक रॅली काढली. सानगडी, साकोली,लाखांदूर, लाखनी व सजक अर्जूनी तालुक्यातील तरूणांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी साकोलीचे शब्बीर पठाण, प्रवीण भांडारकर, जवादे सर आदींनी आपापली मते मांडली.
कार्यक्रमाचे संचलन विदर्भ राज्य आघआडीचे  तालुकाध्यक्ष राकेश भास्कर यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील जांभूळकर, शब्बीर पठाण, दीपक जांभूळकर,बाळू गिर्हेपुंजे, दीपक क्षिरसागर, प्रवीण डोंगरवार, प्रकाश इरले,, विलाश शेंडे, डॉ. विलास शेंडे, विनोद भुते, महेश राऊत, विज.य गभने, सचिन भुजाडे, योगेश कापगते, मुकूल मिश्र, नितीन चंद्रवंशी आदींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...