Saturday, 23 February 2019

मुख्यमंत्री महोदय पीक विम्याची रक्कम कधी देणार

तिरोडा,दि.23 : सन २०१७ च्या खरीप हंगामाकरीता कृषी विभागाकडून रिलायन्स विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा काढण्यात आला.त्यातच गंभीर स्वरूपाचा दुष्काळाशी सामना करावा
लागला. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.यासंदर्भाची पाहणी कृषी विभाग व विमा वंâपनीकडून करण्यात आली. त्यातच राज्य शासनाकडूनही दुष्काळ जाहीर करण्यात आले होते. मात्र, दीड वर्षाचा काळ लोटूनही अद्यापपर्यंत तालुक्यातील नवेझरी येथील महेंद्र भांडारकर या शेतकर्याला विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही.
यासंदर्भात संबंधित विभाग टाळाटाळची भूमिका अवलंबित आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी भांडारकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्यानिमित्त साहेब! विम्याचा लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न
उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विमा कंपनी व शासन शेतकर्यांच्या आत्महत्यांची प्रतीक्षा करीत आहे काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला तालुक्यातील नवेझरी येथील शेतकरी महेंद्र
भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ मध्ये कृषी विभागाकडून पीक विमा उतरविण्याचा तगादा लावण्यात आला होता.दरम्यान मालकीच्या १.२५ हेक्टर आर धानपिकांच्या जमिनीसाठी ९२५ रुपये रोख जमा करून ३१ जुलै २०१७ रोजी कृषी सहायकांच्या उपस्थितीत विमा उतरविण्यात आला होता. मात्र,तोच वर्ष आम्हा शेतकर्यांसाठी दुष्काळाचा ठरला.गंभीर स्वरूपाचा दुष्काळ ठरल्याने मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी झाली असतानाही विमा कंपनीकडून भरपाई मिळेल,अशी आशा पल्लवित होती;परंतु २ वर्षांचा काळ लोटूनही रिलायन्स विमा कंपनीकडून आपणास विम्याची रक्कम
मिळालेली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा सातत्याने करीत असतानाही अधिकारी टाळाटाळची भूमिका अवलंबित आहेत. या प्रकाराने विमा कंपनीकडून शासनामार्पâत शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली काय? असा प्रश्न संतापलेल्या शेतकरी भांडारकर यांनी केला आहे. आज (दि.23) राज्याचे मुख्यमंत्री तिरोडा येथे भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त दौर्यावर येत आहेत.किमान यानिमित्त का होईना आढावा घेवून विमा संदर्भात न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी महेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केली आहे.

Friday, 22 February 2019

साडेचार हजाराची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव,दि.22ः –  काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४५०० रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता आणि शिपाई अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी जिल्हा परिषदेतच ही कारवाई करण्यात आली.  गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम  विभागातील कनिष्ठ अभियंता  पी.डी.पवार (४५, रा. जळगाव) आणि ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचारी मंगेश गंभीर बेडीस्कर (३५, रा. जळगाव) यांचा समावेश आहे.

23 व 24 फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम;मतदारांना नाव नोंदणीची संधी


गोंदिया,दि.22: भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरीकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी दिली आहे.  दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 (शनिवार व रविवार) रोजी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिमेंतर्गत पात्र मतदारांना ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट झाले नाही अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल.
सदर मोहिमेंतर्गत मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना 6 अ अर्ज, मतदार यादीतील नावात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना 7 अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना 8 अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना 8 अ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जाचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 दिनांक 1 जानेवारी 2019 या आर्हता दिनांकावर आधारीत प्रसिध्द अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष  मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच जांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही  आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई


Chanda Kochhar was not allowed to leave the country by the CBI | चंदा कोचर यांना सीबीआयकडून देश सोडून जाण्यास मनाई

मुंबई,दि.22 - व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्या विरुद्ध सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवा असे देखील सांगितल्याची माहिती मिळाली आहे. 
चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. पदाचा गैरवापर करत आपल्या मर्जीतील लोकांना कर्ज देऊन आर्थिक फायदा करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यात चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या. त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता. 

बावनकुळेंच्या मंचावरच भाजप माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भंडारा,दि.22 : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली. 

उपस्थितांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा शहर पाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन आणि कामगार कल्याण विभागाचा लाभ वाटप सोहळा दशहरा मैदानात आज शुक्रवारी (22 फेब्रुवारी) आयोजित होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सोहळा सुरू असताना  माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे अचानक मंचावर आले. पालकमंत्र्यांच्या समक्ष अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी त्याला पकडून व्यासपीठावरुन खाली आणले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.


अकोल्यात शिवसेनेच्या नगरसेवकांना नेले फरफटत

अकोला,दि.22- महापालिका सभागृहात भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही, यावरून माइकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व गजानन चव्हाण या दोघांना शुक्रवारी (दि.22) सभेतच निलंबित केले.
या कारवाईमुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले. परिणामी महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी बळाचा वापर करीत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना सभागृहातून बाहेर फरपटत बाहेर काढत पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
अकोला शहरात योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे सुरु असून या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या संदर्भात शिवसेनेकडून चर्चेची मागणी करण्यात आली.यावर महापौरांनी यासंदर्भात लेखी स्वरूपात माहिती देण्यात येईल असे सांगितले. मात्र महापौरांचे हे म्हणणे शिवसेनेच्या नगरसेवकांना मान्य नव्हते.त्यातच गोंधळाला सुरवात सभागृहात झाली अनं शिवसेनेच्या नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सेजगावचे तलाठी नेवारे एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.22ः-तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील तलाठी नेवारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...