Monday, 10 February 2020

ओबीसींची गणना करा नाही तर राष्ट्रीय जनगणनेवर ओबीसींचा बहिस्कार

ओबीसींच्या जनगणनेसाठी नागरिक रस्त्यावर उतरले



देवरी,दि.10- परक्या इंग्रजांनी ओबीसींची संख्या 1931 मध्ये निश्चित केली. मात्र, स्वतंत्र भारतात संविधानात तरतूद असताना सुद्धा ओबीसींची जनगणना केली जात नाही. येथे कुत्र्या माजरांची गणती होते, मग ओबीसींना त्यांचे संवैधानिक हक्क नाकारले का जात आहेत? देशात ओबीसींची जनगणनेचे आश्वासन देऊन देशात भाजप आघाडीने सत्तेचे सिंहासन मिळवले. तत्कालीन केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत तसे आश्वासन सुद्धा दिले. असे असताना 2021 मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेच्या फार्मेट मध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला नाही. हा विश्वासघात आहे. जोपर्यंत केंद्रातील सरकार ओबीसींच्या गणती साठी स्वतंत्र रकाना देत नाही, तो पर्यंत ही गणना होऊ दिली जाणार नाही. ओबीसी समाज आता यासाठी रस्त्यावर उतरला आहे, असे प्रतिपादन ओबीसीसंघर्ष कृती समितीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या एका सभेत आज सोमवारी (दि.10) केले.
गेल्या 5 तारखेपासून जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने ऱाष्ट्रीय जनगणना 2021 मध्ये ओबीसींची जनगणनेला घेऊन जनजागरण यात्रेची सुरवात करण्यात आली. या यात्रेचे काल रविवारी तालुक्यात आगमण झाले होते. संपूर्ण तालुक्यात भ्रमण करून या यात्रेचे स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर  एका जंगी सभेत रुपांतर  झाले. या यात्रेत ओबीसी नागरिकांसह राजकीय नेते, वकील, कर्मचारी-अधिकारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित झाले होते. दरम्यान, या यात्रेत सहभागी झालेल्यांनी गगनभेदी घोषणी देत ओबीसी जनगणनेची मागणी रेटून धरल्याचे दिसून आले.
पुढे बोलताना श्री कटरे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना न्याय देण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनी घटनेत 340 कलमांतर्गत ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. एससी-एसटीसाठी स्वतंत्र अनुसूची तयार करण्यात आली. मात्र,या देशातील स्वार्थी प्रवृत्तींनी ओबीसींची यादी तयार होऊ दिली नाही. परिणामी, 1931 नंतर ओबीसींची नेमकी संख्या किती, हे कळायला मार्ग नाही. यामुळे ओबीसींचे हक्क मारून त्यांच्या टाळूवरचे लोणी गब्बर लोक खात आहेत. याही वेळेस आपली गणती झाली नाही, तर पुढील 10 वर्षे आपल्याला येथील न्यायव्यवस्था सुद्धा तरतूद असतांना नेमक्या संख्येअभावी न्याय देऊ शकणार नाही. देशाची तिजोरी भरणारा आणि लोकांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील ओबीसीला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची खेळी खेळली जात आहे. घटनेत तरतूद नसताना मराठा असो की सवर्ण आरक्षण एका रात्रीतून दिले जाते. मात्र, ओबीसींना घटनेत तरतूद असताना ते नाकारले जाते. आपले हक्क आपल्याला आता पर्यंत मिळायला पाहिजे होते. मात्र, आपल्या नालायक लोकप्रतिनिधींमुळे आपल्याला रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. मात्र, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. म्हणून सरकारने आपले डोके वेळीच ठिकाणावर आणनू ओबीसींची जणगणना केली पाहिजे असे आवाहन श्री कटरे यांनी केले. यावेळी संदीप तिडके, श्री गायधऩे, राजेश चांदेवार आदीनी सभेला संबोधित केले. या यात्रेत नगरसेवक प्रवीन दहिकर, अनिल येरणे, अड. भुषण मस्करे, छोटेलाल बिसेन, दिलीप द्रुगकर, ज्योतिबा धरमशहारे, जितेंद्र रहांगडाले,भोजराज फुंडे, चेतन उईके, सुदर्शन लांडेकर, बबलू गिऱ्हेपुंजे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, सकाळी 6.55 वाजता घेतला अखेरचा श्वास


नागपूर,दि.10(विशेष प्रतिनिधी) – वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. सात दिवसांपासून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज सकाळी 6.55 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. दुपारी दोन वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रुग्णालयातील डॉ.दर्शन रेवणवार यांनी सांगितले की, काल रात्री साडेबारा पासूनच फुलराणीची प्रकृती खालावत होती. तिला व्हेंटिलेटर लावलेले असतानाही फुफ्फुसातील संसर्गामुळे ऑक्सिजन रक्तात मिसळण्याची प्रक्रिया नीट होत नव्हती. तिच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण सातत्याने खालावत होते. त्यामुळे डॉक्टरांचा चमू चिंताक्रांत झाला होता. व्हेंटिलेटरच्या सेटिंग्स सातत्याने वाढवल्या जात होत्या. मात्र, त्याचा उपयोग होत नव्हता. रात्रभर तिच्यावर डॉक्टरांची देखरेख सुरू होतीच. दरम्यान, पहाटे चार वाजता तिला हृदयविकाराचा मोठा झटका आला. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या चमूने तिला मसाज देऊन हृदयविकाराच्या या धक्क्यातून कसेबसे सावरले. जवळपास पाऊणतास हे प्रयत्न चालले. आता धोका टळला, असे वाटत असताना साडेसहाच्या सुमारास फुलराणीला हृदयविकाराचा दुसरा झटका आला. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पावणेसातच्या सुमारास मृत्यूने फुलराणीला अखेर गाठले.
दुपारी दोन वाजता होणार अंत्यसंस्कार
पीडितेच्या निधनानंतर एकही शासकीय अधिकारी येऊन भेटले नाहीत. आमच्या कुटुंबांची हानी झाली. आम्ही काय वेदना सहन केल्या आमचे आम्हाला माहीत. आरोपीला तशाच वेदना द्या अशी शासकीय अधिकारी येऊन भेटत नाही आणि आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत पार्थिव उचलणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पीडितेच्या वडिलांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणे करून दिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, तसेच याप्रकरणी शासनाकडून ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पार्थिव स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता दोराडा या गावी पीडितेवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पोपटांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

देवरी,दि.10- राष्ट्रीय महामार्ग क्र 53 वरील शिरपूरनजिक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर असे की, काल रविवारी (दि.09) रात्री 11 वाजेच्या सुमारास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात गस्तीवर असलेल्या देवरी पोलिसांच्या चमूने रायपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा इंडिका (क्र. सीजी04- एचसी 0208 ला संशय आल्याने तपासणीसाठी रोखले. वाहनात गोणपाटामध्ये पॅकिंग केलेले ताराच्या पाच पिंजऱ्याविषयी वाहनचालक मोहम्मद असलम शेख फरीद (वय 35) राहणार न्यू राजेंद्रनगर रायपूर याला विचारणा केली असता त्याने स्थानिक आदिवासी लोकांकडून अवैधरीत्या पोपटांची खरेदी करून जादा भावाने नागपूरच्या बाजारात विक्री करीत असल्याची कबूली दिली. जप्त केलेल्या पाच पिजऱ्यातून 209 पोपट आढळून आले. हे पोपट 200 - 500 रुपये दराने विक्री करीत असल्याची माहीती आरोपींनी दिली. या कामात त्याला मदत करणारा मोहम्मद जाबीर मोहम्मद महेबूब राहणार संजयनगर रायपूर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पशूपक्ष्यांची वाहतुक करून तस्करी करणे गैरकायदेशीर असल्याने पोलिसांनी आरोपींसह मुद्देमाल आणि वाहन जप्त करून देवरीच्या वनविभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. उल्लेखनीय म्हणजे अशा प्रकारची बेकायदेशीर पशूपक्ष्यांची तस्करी ही मोठी नवीन बाब नाही. वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमध्ये ठाणेदार बच्छाव यांचेसह हवालदार कावळे , राऊत, नायक उईके आणि बोहरे यांचा समावेश होता.






Sunday, 9 February 2020

लाखनी येथिल शिक्षिकेचा अपहरणाचा प्रयत्न


भंडारा,दि.09ः- तालुक्यातील मोहदूरा येथे एका प्रवचनकार महाराजाने विवाहित महिलेसोबत पळ काढल्याची घटना ताजी असतानाच लग्न करण्यासाठी एका कॉन्व्हेंटच्या शिक्षिकेचे त्याच कॉन्व्हेंटच्या व्हॅनचालकाने व्हॅनमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्हॅनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आशिष सुरेश टेंभुर्णे (३२) रा. लाखनी, असे आरोपी व्हॅनचालकाचे नाव असून तो विवाहित आहे. त्याला दोन मुलेही आहेत.
शुक्रवारी लाखनीतील एका खासगी कॉन्व्हेंटमधील शिक्षिका व तिची मैत्रीण बसस्थानकासमोर उभे असताना व्हॅन चालक आशिष टेंभूर्णे याने दोघांना गाडीत बसविले. त्यानंतर बाजार समितीसमोर व्हॅन थांबवून शिक्षिकेची मैत्रिण खाली उतरली. त्याचवेळी आरोपी आशिष टेंभूर्णे याने त्या शिक्षिकेस जबरीने व्हॅनमध्ये बसवून ‘माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर तिला व्हॅनमध्ये कोंबून लाखोरी गावाच्या दिशेने व्हॅन पळविली. इकडे, शिक्षिकेच्या मैत्रिणीने शिक्षिकेच्या पालकांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर शिक्षिकेला भ्रमणध्वनी करुन विचारले असता ती लाखोरी येथे असल्याचे तिने पालकांना सांगितले. त्यामुळे आपण आता पकडले जाऊ, म्हणून व्हॅनचालक आशिषने शिक्षिकेला लाखोरी येथे उतरवून पळ काढला. त्यानंतर शिक्षिकेने लाखनी पोलिस ठाण्यात येऊन तक्र ार नोंदविली. पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी तात्काळ विविध पथक तयार करून आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केले. पोलिसांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार/ मुंडीपार येथील एका नातेवाईकाच्या घरून आशिषला अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, सहाय्यक उपनिरीक्षक विजय हेमणे, नरेंद्र मुटकुरे, भगवान थेर, दिगंबर तलमले, सुभाष राठोड, पोलिस नायक उमेश शिवणकर, लोकेश ढोक, महिला पोलिस नायक शालू भालेराव, वासंती बोरकर, वर्षा खोब्रागडे, पोलिस शिपाई पीयुष बाच्चल, नितीन झंझाड, अनिल राठोड, राजेंद्र लांबट, जितेश रोडगे यांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अरविंद साळवे लाखनी पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. आशिष टेंभुर्णेविरुद्ध अपहरण, विनयभंग, सार्वजनिक ठिकाणी ईल शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

berartimes special page 9th feb 2020





Saturday, 8 February 2020

राजाभोज समाजरत्न पुरस्कार २०२० मरणोपरांत प्रदान


सालेकसा,दि०8-: साखरीटोला राजाभोज पोवारसंघ द्वारा कवडी येथे आयोजित राजभोज जयंतीउत्सव कार्यक्रमात राजाभोज समाजरत्न पुरस्कार 2020 चे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.हा पुरस्कार आपल्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी मोठ्या मनाने ज्यांनी पुढाकार घेत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला.अशा रेव्याणी आरती राधेश्याम रहांगडाले (७ वर्ष गाव -भजेपार/आमगाव) तसेच  नरेश पारणबाई गोविंद पटले (४३ वर्ष गाव -तिरखेडी/सालेकसा) या महान दानविरोनी अवयवदान करुन ०९ मनुष्यांना जीवनदान  दिले आहे.असे महान कार्य करणार्या समाजरत्नांचा सन्मान म्हणून  आरती राधेश्याम रहागंडाले व पारणबाई गोविंद पटले यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोतनभाऊ रहागंडाले तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य ओ.सी.पटले उपस्थित होते.मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे होते. शोभायात्रा शुभारंभ अतिथी म्हणून आमगाव पोवार समाज संघटनेचे सचिव राजूभाऊ पटले यांच्यासह माजी उपसभापती जयकृष्ण रहागंडाले,सरपंच किशोर रहागडाले,माजी सरपंच नोहरलाल चौधरी,रवीलाल ठाकरे,नानू बिसेन,उपसरपंच विनोद ठाकरे,अज्जू रहागंडाले,सरपंच इंदिरा चौधरी,ढिवरु शरणागत,उपसरपंच देवेंद्र अंबुले,रामू कटरे,सरपंच सुनीताबाई तुरकर,लक्ष्मण राणे,शामशंकर बघेले,द्वारकाबाई पटले,नीलाबाई ठाकरे,दुर्गेश्वरीबाई बोपचे,विमलताई कटरे, चंद्रकांताबाई रहागंडाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन जियालाल पारधी व मनोज शरणागत यांनी केले.आयोजनासाठी अंजोरा,पानगाव,कवडी,वडद-कटंगटोला,कारुटोला,तेलीटोला,जैतुरटोला,येरमडा,रामपूर,रामाटोला व साखरीटोला येथील समाज संघटनांसह राजाभोज पोवारसंघ समितीचे पदाधिकारी फत्तुलाल बघेले,हरिभाऊ कटरे,मनोज शरणागत,जियालाल पारधी,रेखलाल गौतम,प्रतिम चव्हाण,तेजलाल ठाकरे,चंद्रशेखर बिसेन आदींनी सहकार्य केले.

कोरोनाग्रस्त २0 हजार रुग्णांना ठार मारण्याची चीनने मागितली परवानगी

सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

सिडनी : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असून चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाने ६१८ जणांचे बळी घेतले. यावर उपाय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाने आपण कोरोना विषाणूवर लस बनवण्याच्या अगदी जवळ गेल्याचा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या एका हाय- सेक्युरिटी प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात येत असून इथे संशोधनासाठी सर्व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून या विषाणूचा नमून्यापासून हा विषाणू आयसोलेट करण्यात ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी गेल्याच आठवड्यात यश मिळवले होते. सीएसआयआरओमध्ये या विषाणूचा विकास पाहता प्री-क्लिनिकल अभ्यासासाठी विषाणू मोठय़ा संख्येने उपलब्ध व्हायला हवेत असा अनुमान काढण्यात आला आहे. आयसोलेट करण्यात आलेला हा विषाणू आम्हाला दाखवण्यात आल्याचे 'सीएसआयआरओ' चे पॅथोजन्स चमूचे प्रमुख प्राध्यापक एस. एस. वासन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आम्ही डॉर्टी इन्स्टिट्यूटच्या आमच्या सहकार्‍यांचे आभार मानतो. त्यांनी आयसोलेट करण्यात आलेला विषाणू आम्हाला दाखवला आहे, असे प्राध्यापक वासन म्हणाले. खरा विषाणू असेल तर काम जलद गतीने होते आणि प्री-क्लिनिकल अभ्यास करून त्यावर लवकरच औषध तयार करण्याला मदत मिळते, असे वासन म्हणाले.
ऑस्ट्रेलियन अँनिमल हेल्थ लॅबमध्ये माझे सहकारी देखील निदान, सर्व्हिलन्स आणि रेस्पॉन्सवर काम करत असल्याची माहिती, वासन यांनी दिली. आमची प्रयोगशाळा या विषाणूंची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचेही वासन म्हणाले. मात्र, त्यांच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूंची संख्या किती हे त्यांनी स्पष्ट केले नाही. जगभरात कोरोना विषाणूवर औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यावर प्राध्यापक वासन म्हणाले की, 'प्री-क्लिनिकल अभ्यासासाठी आवश्यक लस उपलब्ध करण्याबरोबर यामुळे आता औषध तयार करण्याच्या प्रयत्नांनाही गती मिळेल. बिट्स पिलानी आणि आयआयएससी-बेंगळुरूचे विद्यार्थी असेलेले वासन यांनी स्कॉलरशीप प्राप्त करून ऑक्सफॉर्डच्या ट्रिनिटी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. तेथून त्यांनी डॉक्टरेट ही उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिकासारख्या विषाणूंवरदेखील काम केले आहे.वृत्तसंस्था/बीजिंग
कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या आजाराची लागण झाल्याने चारशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी चीन सरकार मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. चीन सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे २0 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांना ठार मारण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली आहे. मात्र अद्याप याबाबत चीनमधील कोणत्याही वृत्तसंस्थेने दुजोरा दिलेला नाही. परंतु, सध्या सोशल मीडियावर यासंदर्भात बातम्या प्रसारित होत आहेत.
चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा जीव गेला आहे. वुहान शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर वेगाने पसरत आहे. चीनने मागील आठवड्यात कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांसाठी १0 दिवसांत एक हजार बेडची सुविधा असणारे रुग्णालय बांधले. परंतु, आता या रुग्णालयातील काही डॉक्टसर्ंनादेखील कोरोना व्हायरची लागण झाली आहे. तसेच येथे काम करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या रुग्णांमुळे कोरोना व्हायरस इतर रुग्णांमध्येही पसरत आहे. त्यामुळे या रुग्णांचे बलिदान दिले नाही तर इतर नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे चीन सरकारने याचिकेमध्ये म्हटले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ताइवान न्यूज रिपोर्टने दिले आहे. चीनमध्ये उद्धभवलेल्या या व्हायरचा संसर्ग इतर देशातही झाला आहे. भारतात केरळ राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण आढळले आहेत. तसेच या व्हायरसची तीव्रता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.
नवजात बाळाला लागण
चीनमधील वुहान शहरात वार्‍याच्या वेगासारखा पसरलेला कोरोना व्हायरस दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. या व्हायरस च्या विळख्यात आता मोठय़ा लोकांसह चक्क नवजात बालकही अडकले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या नवजात बालकाला अवघ्या ३0 तासांच्या आतच कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. चीनच्या अधिकृत माध्यमांनी ही माहिती दिली. हे नवजात आतापयर्ंत सर्वात संक्रमित रुग्ण आहे. या संसगार्मुळे चीनमध्ये ५६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकाला आईच्या गर्भात किंवा जन्म झाल्यानंतर लगेचच संक्रमण झाल्याची शक्यता आहे. बालकाला जन्म देण्याआधी आईचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. तज्ज्ञांनुसार ही घटना व्हर्टिकल ट्रान्समिशनचा प्रकार असू शकते. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आईद्वारे गर्भात किंवा बाळाच्या जन्मानंतर व्हायरसची लागण होते.
सर्वात प्रथम कोरोनाची माहिती देणार्‍या डॉक्टरचा मृत्यू
जगभरात शेकडो जणांचे प्राण घेणार्‍या कोरोना व्हायरसची सर्वात प्रथम माहिती देणार्‍या चीनच्या डॉक्टरचा या व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टर ली वेनलियांग हे या व्हायरसचे प्रमुख केंद्र ठरलेल्या वुहान शहरात नेत्रतज्ज्ञ होते. यावेळी त्यांच्या लक्षात आले की २00२-0३ मध्ये सिवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) विषाणूसारखेच लक्षणे रुग्णामध्ये दिसत आहेत. 34 वर्षीय ली यांनी आपल्या सहकाऱ्याला 
याबाबत माहिती दिली. मात्र ली यांच्यासह अफवा पसरवत असल्याचे सांगत ८ जणांना पोलिसांनी पकडले होते. ली यांनादेखील कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. अखेर वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाल्याची माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली. आतापर्यंत ५00 पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला असून, २८ हजारांपेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. तर लाखो लोक आपल्या घरात बंद आहेत. रुग्णांमध्ये सार्स विषाणुंची लक्षणे आढळल्यावर ली यांनी आपल्या सहकार्‍यांना याबाबत माहिती देत सुरक्षा करणारे मास्क आणि कपडे घालण्यास सांगितले होते. यानंतर ४ दिवसांनी ली यांच्यासह ८ जणांनी अफवा पसरवल्याच्या कारणामुळे अटक केले होते. ली यांनी जानेवारीमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले होते की, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली असल्याचे मान्य करण्यासाठी त्यांना एका पत्रावर स्वाक्षरी देखील करण्यास सांगितले होते. चीनमधील सोशल मीडिया युर्जससाठी ली वेनलियांग एकप्रकारे हिरो झाले आहे. नेटकरी अधिकार्‍यांनी वेळेवर योग्य पाऊले न उचलल्यामुळे संताप व्यक्त करत आहेत.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...