Sunday 9 February 2020

लाखनी येथिल शिक्षिकेचा अपहरणाचा प्रयत्न


भंडारा,दि.09ः- तालुक्यातील मोहदूरा येथे एका प्रवचनकार महाराजाने विवाहित महिलेसोबत पळ काढल्याची घटना ताजी असतानाच लग्न करण्यासाठी एका कॉन्व्हेंटच्या शिक्षिकेचे त्याच कॉन्व्हेंटच्या व्हॅनचालकाने व्हॅनमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्हॅनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आशिष सुरेश टेंभुर्णे (३२) रा. लाखनी, असे आरोपी व्हॅनचालकाचे नाव असून तो विवाहित आहे. त्याला दोन मुलेही आहेत.
शुक्रवारी लाखनीतील एका खासगी कॉन्व्हेंटमधील शिक्षिका व तिची मैत्रीण बसस्थानकासमोर उभे असताना व्हॅन चालक आशिष टेंभूर्णे याने दोघांना गाडीत बसविले. त्यानंतर बाजार समितीसमोर व्हॅन थांबवून शिक्षिकेची मैत्रिण खाली उतरली. त्याचवेळी आरोपी आशिष टेंभूर्णे याने त्या शिक्षिकेस जबरीने व्हॅनमध्ये बसवून ‘माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर तिला व्हॅनमध्ये कोंबून लाखोरी गावाच्या दिशेने व्हॅन पळविली. इकडे, शिक्षिकेच्या मैत्रिणीने शिक्षिकेच्या पालकांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर शिक्षिकेला भ्रमणध्वनी करुन विचारले असता ती लाखोरी येथे असल्याचे तिने पालकांना सांगितले. त्यामुळे आपण आता पकडले जाऊ, म्हणून व्हॅनचालक आशिषने शिक्षिकेला लाखोरी येथे उतरवून पळ काढला. त्यानंतर शिक्षिकेने लाखनी पोलिस ठाण्यात येऊन तक्र ार नोंदविली. पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी तात्काळ विविध पथक तयार करून आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केले. पोलिसांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार/ मुंडीपार येथील एका नातेवाईकाच्या घरून आशिषला अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, सहाय्यक उपनिरीक्षक विजय हेमणे, नरेंद्र मुटकुरे, भगवान थेर, दिगंबर तलमले, सुभाष राठोड, पोलिस नायक उमेश शिवणकर, लोकेश ढोक, महिला पोलिस नायक शालू भालेराव, वासंती बोरकर, वर्षा खोब्रागडे, पोलिस शिपाई पीयुष बाच्चल, नितीन झंझाड, अनिल राठोड, राजेंद्र लांबट, जितेश रोडगे यांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अरविंद साळवे लाखनी पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. आशिष टेंभुर्णेविरुद्ध अपहरण, विनयभंग, सार्वजनिक ठिकाणी ईल शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...