Tuesday 4 February 2020

नगरपंचायत देवरीचे दुर्लक्षित कारभार

देवरी- ४ विकासाचे आणि स्वच्छ नगरीचे धिंडोरा पिटणाच्या नगरपंचायत  देवरी चे विकास कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. नाल्याचे काम झाले पण त्यावरील लावलेले झाकण १-२ महिन्यातच फुटलेले बघायला मिळतात यामुळे लहान मुलांना दुखापत होणे वाहनाचे नुकसान होणे हि नवीन गोष्ट राहली नाही. विशेष म्हणजे नगरपंचायतीचा आरशा असलेला क्रीडांगणावर लाखो रुपयाचे खर्च करून स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठमोठाले पैंटिंग करून सुद्धा दिव्या खाली अंधार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
सविस्तर वृत्त असे की  दोन दिवसापासुन जिवंत तारेसह प्रकाश देणारा दिवा खाली पडुन आहे  सलग दोन दिवसापासुन पावसामुळे ओलावा निर्माण झाला आहे.  सकाळ सायंकाळी विध्यार्थी आणि शहरातील नागरिकांना याचा त्रास होणे व  जीवितहानी होणे नाकारता येत नाही.
विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते परंतु स्वच्छते कडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. विशेष करून क्रीडांगणावर दारू पिऊ तमाशा करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत नाही याचा परिणाम विध्यार्थी, महिला आणि सभ्य नागरिकांना भोगावा लागत आहे. नगर पंचायतीच्या ग्रीन जिम चे सुद्धा बारा वाजल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
याकडे विशेष लक्ष देऊन सोयी सुविधा पुरविण्यात याव्या यांची मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...