Sunday 2 February 2020

ओबीसींसाठी रकाना नसेल तर जनगणनेवर आमचा बहिस्कार

अर्जूनी मोरगाव मध्ये ओबीसींचा एल्गार

अर्जूनीमोर,दि.2- आगामी एप्रिल महिन्यापासून राष्ट्रीय जनगणनेला सुरवात होत आहे. जनगणनेच्या प्रारुपामध्ये ओबीसींसाठी कोणताही रकाना नाही. त्यामुळे ओबीसींची गणना केली जाणार नाही, हे स्पष्ट आहे. यावरून  केंद्रीय मंत्री रामनाथ सिंह यांनी ओबीसींची गणना करण्याविषयी दिलेले आश्वासन पार हवेत विरले. जनगणना प्रारुपात ओबीसींचा रकाना असेल तरच सहकार्य अन्यथा ओबीसींचा या जनगणनेवर बहिस्कार, या विषयी गावागावात पोस्टर चिपकाओ आणि जागृती अभियान तालुक्यात धडाक्यात राबविले जात आहे.
अर्जूनी मोरगाव तालुक्यात येत्या 5 फेब्रुवारीला ओबीसी जागृती अभियानाची सुरवात सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक तहसील कार्यालयात एका सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेला राष्ट्रीय नेते, मंत्री, खासदार, आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. यानंतर ही यात्रा ताडगाव,झरपडा, धाबेटेकडी, वडेगाव, ईटखेडा, इसापूर,खामखुर्रा, महागाव, सिरोली, केशोरी, बोंडगाव, सुरबन, गोठणगाव, कोहलगाव आणि रात्रीला नवेगाव बांध येथे मुक्काम अशी निघणार आहे.
6 फेब्रुवारीला देवलगाव, कुंभीटोला, बाराभाटी, पिंपळगाव, अरततोंडी, निमगाव, बोंडगावदेवी, खांबी, चान्नाबाक्टी, बोरगाव,सावरटोला नवेगाव पांढरवाणी, परसोडी येथून कोहमाराकडे प्रस्थान करणार आहे.
वाघ, शेऴी कुत्रे, मांजर जनावरे यांची गणना सरकारला मान्य आहे. परंतु. सन 1931 नंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी सह अन्य प्रवर्गाची गणना शासनाला मान्य नाही. ओबीसींचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तर उंचावण्यासाठी ओबीसींची गणना होणे अत्यावश्यक आहे. परिणामी, आगामी राष्ट्रीय जनगणना पत्रकामध्ये ओबीसींचा रकाना असेल तरच जनगणनेला सहकार्य अन्यथा ओबीसींचा जनगणनेवर बहिस्कार राहणार आहे. यासाठी गावागावात जागृती अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...