Sunday 2 February 2020

आशा वर्करांच्या समस्यांना सभागृहात वाचा फोडणार- आ.सहसराम कोरोटे

देवरी,दि.02- आमगाव विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल आणि मागास भाग म्हणून ओळखला जातो. आशा वर्करच्या रुपाने तुम्ही या भागातील तळागाळात राहणाऱ्या गरीब आणि गरजू लोकांच्या सतत संपर्कात असता. या भागात ज्या काही समस्या आपल्या निदर्शनात येतात, त्या सर्व समस्या मला कळवत चला. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी आशा वर्करांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला किमान चतुर्थ श्रेणीचे फायदे कसे मिळवून देता येतील, यावर माझा भर असेल, असे प्रतिपादन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी काल शनिवारी (दि.1) देवरी येथे बोलताना केले.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने  राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्गत आयोजित आशा वर्कर दिनानिमित्त एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार यांचे अध्यक्षतेत आमदार कोरोटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, डॉ. लता लांडगे, बळीराम कोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सन 2018-19 या वर्षात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये  तालुकास्तरीय विभागात ममता गोखले प्रथम, रविता कोटांगले द्वितिय तर प्राथमिक केंद्र स्तरावर एकादशी राऊत प्रथम, अनिता तावाडे द्वितीय (मुल्ला केंद्र),  शिवन पडोसी प्रथम, दुर्गा मेश्राम द्वितीय (फुटाणा केंद्र), सुनंदा सोनकुकरा प्रथम, सूर्यमाला साखरे द्वितीय ( घोनाडी केंद्र) तर ककोडी केंद्रातून सुशीला सलामे हिला प्रथम  पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देण्यात आला. उर्वरित सर्व आशा वर्कर यांना प्रस्ततिपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांनी केले. संचलन क्षयरोग पर्यवेक्षक संजय भागवतकर यांनी केले. उपस्थितांचे आभार आरोग्य साहाय्यक आत्माराम वंजारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश थोरात, राजेंद्र शहारे, एम.एस समरित, जितेंद्र हातझाडे, प्रियतमा रामटेके, सुरज पेंदाम, कैलाश लाडे आदींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...