भंडारा, दि. 1 : आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या 75 बाइकर्सचा ताफा 25 हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान भंडारा शहरात रविवारी पोहचला. भंडारा येथील क्रीडा प्रेमींनी धाडसी प्रवास्यांचा उत्साहात स्वागत केले. केंद्र व राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय खेल प्राधिकरण ऑल इंडीया मोटरबाइक एस्पिटिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील 75 बाइकर्स हे देशातील ऐतिहासीक स्थळांना भेटी देणार असून या रॅलीच्या माध्यमातून विविधतेतील एकता असणाऱ्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून हे सर्व 75 बाइकर्स स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना आरोग्य आणी फिटनेसचा संदेश प्रसारीत करुन भारतीय वारसा तसेच संस्कृती यावर एक माहितीपट तयार करण्यात येणार आहे. ही मोहीम 75 दिवसांची असून देशातील 34 राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 21,000 कि.मी.च्या प्रदेशामध्ये ही मोहीम चालविणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 75 Bike Rider यांचे खासदार सुनिलजी मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरीक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, भारतीय खेळ प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक श्रीनिवास माळेकर, सहाय्यक संचालक सुमेध तरोळेकर, वरिष्ठ मार्गदर्शक आशिष बॅनर्जी, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक हितेंद्र वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बाइकर्सचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू व नागरीक उपस्थित होते.
Tuesday, 1 November 2022
फ्रिडम रायडरचे भंडारा मध्ये भव्य स्वागत;75 बाइकर्सचा 25 हजार किलोमीटर प्रवास
राजकीय शरद पवारांची प्रकृती बिघडली:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू
काय म्हटले पत्रात?
राष्ट्रवादी काँग्रेसने एक पत्र काढून शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.
कधी मिळणार डिस्चार्ज?
पत्रात पुढे म्हटले आहे की, शरद पवारांना 2 नोव्हेंबर 2022 रोजी डिस्चार्ज मिळेल. ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4
व 5 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये.
Sunday, 18 April 2021
जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
देवरी पोलिसांची धडक कार्यवाही
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील शेडेपार शेतशिवार आणि मरामजोब नजिकच्या झुडपी जंगलात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीवरून, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे नेतृत्वातील एका पथकाने सुमारे साडेसातच्या सुमारास शेडपार नजिक शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये उमेश शाहू, कवलदीपसिंग भाटिया, अविनाश ढवळे, आणि रोशन बागवा यांचा समावेश आहे. या आरोपींकडून 2 मोबाईल सह एकूण 43 हजार910 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दुसरी कार्यवाही ही मरोमजोब परिसरातील झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करण्यात आली. यामध्ये एकूण 11 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचेकडून 7 मोबाईल, 5 मोटारसायकलींसह 3 लाख 64 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर देवरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. देवरी पोलिसांनी केलेल्या या कारवायांबद्दल परिसरातील नागरिक पोलिसांचे कौतूक करीत असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
Saturday, 17 April 2021
खा. सुनील मेंढे यांनी केली गोंदिया जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी.
गोंदिया.दि.17- खा.सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील शासकीय तथा खाजगी वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांसाठी वाढीव खाटांची व्यवस्था करणे, वैद्यकीय उपकरणे व औषधी सहजरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सिंधी समाज बांधवांसोबत भेट घेवून कोरोना विषाणूच्या या भयावह परिस्थितीवर कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली. स्थानिक सिंधी मनिहारी धर्मशाळेत ७० खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले. या ठिकाणी वैद्कीय सेवा देण्यासाठी खा. मेंढे यांनी डॉ. दीपक बाहेकर यांना विनंती केली. यावेळी राजकुमार नोतानी, मनोहर आसवानी, महेश आहुजा, शंकरलाल मेघांनी, हरिराम आस्वानी, राजू चावला, नारी चांदवानी, प्रेम चांदवानी, सुनील रामानी, आशिष फुंदनानी, अनिल हुंदानी, सुनील चावला, धरम खटवानी, श्रीचंद डोडानी, राम लालवानी, रवी बोधानी, नरेश लालवानी, मनोज दूर्गानी, अशोक जयसिंघानिया, आदेश शर्मा,व गूड्ड चांदवानी उपस्थित होते.
कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवा -ना. विजय वडेट्टीवार
गोंदिया, दि.17 : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेवून कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.
17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोविड उपाययोजना संदर्भात आढावा
बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लस उपलब्धता, रेमडेसिव्हर,
ऑक्सीजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबाबत आढावा घेण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सहेषराम कोरोटे, जिल्हाधिकारी दिपक कुमार
मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक
विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मंत्री
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात भर देण्यात
यावा तसेच ज्या रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे त्या ठिकाणी खाजगी हॉस्पीटल
व डॉक्टर्सची मदत घेण्यात यावी. खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत विशेष
लक्ष देण्यात यावे. जिल्ह्यात RTPCR व Antigen टेस्टींग वाढविण्यात याव्यात. ऑक्सीजनचा पुरवठा वाढविण्यात
यावा. ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी राजनांदगाव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात आला असून लवकरच उपलब्ध होणार आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची माहिती
सांकेतिक स्थळावर (डॅशबोर्डवर) प्रसिध्द करण्यात यावी. पोलीस यंत्रणेने
संचारबंदीमध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा. कोरोना उपाययोजनेवर जिल्हा नियोजन
समितीमधून 30 टक्के निधी खर्च करण्यात यावा. कोरोना उपाययोजनेबाबत आपण निधीची
मागणी करा, निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सभेला निवासी उपजिल्हाधिकारी
जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, नगरपरिषचे मुख्याधिकारी करण चव्हाण,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना
सवरंगपते व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते.
प्राणवायू अभावी केटिएस रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त निराधार - अधिष्ठाता
फ्रंट लाइन वर्कर्सना औषधोपचार उपलब्ध करून द्या- राज्य सरकारी कर्मचारी संघटना
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...




