![]() |
टोलसिंह पवार |
सविस्तर असे की, स्व. पवार यांना प्रकृती स्वास्थ्यामुळे दोनदिवसांपूर्वी गोंदियाच्या बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनी रुग्णालयातून सुटी घेतली. ते सुरतोली येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांचे आपल्या मित्रमंडळीशी फोनवर बोलणे केले. घरच्यामंडळीशी संवाद साधत असताना त्यांची प्रकृती अचानक खालवली आणि थोड्याच वेळात त्यांची इहलोकीची यात्रा संपुष्टात आली. मृत्यू पश्चात त्यांचे मागे दोन मुले, चार मुली, माजी जिप सदस्य दीपक पवार आणि नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याशिवाय गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या त्यांच्या चाहत्यावर दुःखाचे डोंगर कोसळल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
गोंदिया-भंडारा जिल्ह्याची राजकारणात स्व. टोलसिंह पवार यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ प्रवास आणि अनुभव याचा जिल्ह्याच्या विकासात मोठा वाटा आहे. त्यांनी सुरतोलीचे सरपंच पदापासून तर देवरी पंचायत समितीचे उपसभापतीपद, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. कॉंग्रेस पक्षातही ते मोठ्या पदावर राहिले आहेत. ते कायद्याचे उत्तम जाणकार म्हणूनही नावाजलेले होते. गोंदिया जिल्हा निर्मितीकरीता त्यांचे योगदान अमूल्य आहे. देवरी तालुक्याच्या विकासाचा पाया रचण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणातील एका प्रकाशमान ताऱ्याचा अस्त झाला आहे.
स्व. टोलसिंह पवार यांचेवर आज दहा वाजता स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment