Monday, 12 March 2018

वनरक्षक 1200 रुपयांची लाच घेतांना अटक


गोंदिया,दि.12 : गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकला १२ शे रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबी ने रंगेहात अटक केली असून एंथोनी निकोलस सायमन असे या वनरक्षकाचे नाव आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार हा खमारी रोप वाटिकेत रोजंदारीचे काम करतो.दि.३ मार्च रोजी आरोपीने तक्रार दाराशी खमारी रोप वाटिकेत जून ते जुलै या महिन्या पर्यंत  नियमित काम देन्यासाठी १२ शे रुपयांची लाच मागितली पण तक्रार कर्त्याची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.त्या तक्रारीची गंभीर दखल घेत आज    एसीबी ने सापळा रचून आरोपी वनरक्षकाला रंगेहात अटक करून गोंदिया (ग्रामीण)पोलीस स्टेशन मध्ये आरोपीवर गुन्हा दाखल केला.हि कार्यवाही पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,नागपूर, यांच्या मार्गदर्शनात गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी रित्या पार पाडली.


Sunday, 11 March 2018

देवरीतील दिव्यांगांच्या राज्य क्रीडा स्पर्धा यशस्वी करा- पालकमंत्री बडोले


२३ ते २५ मार्च दरम्यान स्पर्धांचे आयोजन

गोंदिया,दि.११ : दिव्यांग व्यक्तीच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा येत्या २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून ह्या स्पर्धा यशस्वी करा. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
काल १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देवरी येथील क्रीडा संकुलात समाज कल्याण व विशेष साहाय्य विभाग यांच्या संयुक्त वतीने २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेताना श्री.बडोले बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.बडोले म्हणाले, दिव्यांगांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना तीन टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. देवरी येथे होणाèया राज्यस्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातून ३ हजार ५०० विद्यार्थी व ५०० कला आणि विशेष शिक्षक येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना रेल्वे स्टेशन व बसस्थानकावरून क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विभागाने क्रीडा स्पर्धेच्या
ठिकाणी १०८ क्रमांक अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धा बघण्यासाठी आणावे, असे त्यांनी सांगितले. श्री.पाटील म्हणाले, दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्याचे, त्यांच्या निवास व भोजनाच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुलामुलींसाठी मूकबधिर, मतिमंद,अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गात ह्या क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.गायकवाड म्हणाले, क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी मोबाईल शौचालय, ई रिक्षाची सुविधा तसेच खेळताना खेळाडूला दुखापत झाल्यास औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी. क्रीडा स्पर्धेदरम्यान बसस्थानक गोंदिया व देवरी नियंत्रण कक्ष सुरू करावा. खेळाडूंसाठी काळजीवाहकाची व्यवस्था करावी. या दरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. असे त्यांनी सांगितले.
सभेला क्रीडा स्पर्धेशी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मिqलद रामटेके यांनी मानले.

Friday, 9 March 2018

आठ हजार महिलांनी साकारले ‘बेटी बचाओ’



वाशीम ,दि.09- जिल्ह्यातील महिला, मुलींनी (दि. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्‍वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील आठ हजार ३१८ महिला-मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. ८-३-२०१८ या तारखेचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या लोगोमागे स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश होता. केवळ महिला व मुलींनी इतक्‍या मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी साखळीतून अशा प्रकारचा जगात पहिल्यांदाच लोगो साकारला गेल्याने या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने घेतली आहे.स्त्री-भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींना शिक्षण व समान संधी मिळण्यासाठी समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा याकरिता जिल्ह्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबवले जात आहे. या अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. त्यानुसार येथील पोलिस कवायत मैदानावर  झालेल्या कार्यक्रमात महिला व मुलींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा संदेश दिला.

तोतया पोलिसांनी महिलेला लुटले

गोंदिया,दि.09 : तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेची फसवणूक करून दोन लाख १0 हजार किमतीचे दागिने चोरी केल्याची घटना राजलक्ष्मी चौकात घडली. फिर्यादी बीपीन अंबालाल पटेल यांची आई कमलाबेन पटेल (७२) या राजलक्ष्मी चौकातून जात असताना आरोपींनी आपण पोलिसात असल्याचे सांगून समोर दंगा होत असल्याचे सांगून त्यांच्याजवळील दागिने सुरक्षीत ठेवण्याचे आमिष देवून स्वत:जवळ ठेवले. दरम्यान आरोपींनी त्यांना खोटे देवून फसवणूक केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार धनबाते करीत आहेत.

हृदयविकाराच्या झटक्याने हवालदार ठवकर यांचे मृत्यू


अर्जुनी मोरगाव,दि.09ः- तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर ठवकर (वय ४५) आज दि.०९ ला दुपारी बारा वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दवी मृत्यू झाला.हवालदार ठवकर हे पोलीस ठाणे केशोरी येथे कर्तव्यावर असताना अचानक ह्रदयविकाराच्या झटका  आल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले.मात्र ह्रदयविकाराचा झटका हा अतिशय तीव्र असल्याने त्यांचा ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगावला मृत्यू झालेला होता. त्यांचा मूळ गाव पालोरा/करडी असून त्यांच्या मागे १ मुलगा १ मुलगी असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या स्वगावी करण्यात येणार आहे.

भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीला विरोध,एक षडयंत्र…!


गोंदिया,दि.७ः- भारतीय राज्यघटनेत निवडणूक आयोगाची तरतूद आहे. या आयोगाच्या कामाची पद्धतसुद्धा निश्चित आहे. निवडणुका कधी व कशा घ्यायच्या या संदर्भात भारतीय राज्यघटनेत निर्देश वा अधिकार देणाèया तरतुदी सुद्धा आहेत. जरी पोट निवडणुक घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असले तरीही केवळ आणि केवळ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसंदर्भात न्यायपालिकेचा आधार घेत अडथळा निर्माण करण्याचे कोणते कारण असू शकते, याविषयी आता चर्चांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
घटनेतील तरतुदींवर आक्षेप वा हरकत घ्यायची होती, तर ती संपूर्ण संघराज्यातील निवडणुकांसंदर्भात का घेतली गेली नाही. समाजकारणाच्या नावावर केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी असा घाणेरडा प्रकार म्हणजे राज्यघटनेचा अपमान करणे असा त्याचा कोणी अर्थ लावला तर तो चुकीचा ठरू नये. निवडणुकीवरील खर्च ही जर गंभीर बाब समजली जात असेल तर त्याच वेळी याचिका दाखल करण्यापासून तर याचिकेचा निकाल येईपर्यंत होणारा खर्च हा कुठून व कसा भागवला जाईल, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
सामाजिक कार्यकत्र्यांच्या नावावर रचलेला हा राजकारणी डाव न समजण्यापलिकडे मतदार आता अडाणी राहिले नाहीत.
भारतीय राज्यघटनेत निवडणुका या लोकशाहीचा आधार आहेत. काही कारणाने एखादी जागा रिकामी होत असेल तर त्या जागेसाठी एका ठराविक कालावधीत निवडणूक घेणे, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी व कर्तव्य आहे. मग घटनेतील त्या तरतुदीला विरोध करणे, हा घटनाद्रोह का समजला जाऊ नये? एखाद्या व्यक्तीने त्या घटनांना न्यायालयात आव्हान देणे हे न समजण्यापलिकडे आहे.
त्यातही फक्त स्वतःच्या किंवा काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी असले वर्तन लोकशाहीला घातक असते. जर पोटनिवडणुकांना विरोधच करायचा असेल तर तो इतरही जागांसाठी केला गेला पाहिजे होता. केवळ भावनिक आणि दिशाभ्रमित करणारे कारण देणे, ही इष्ट पद्धती नाही. केŸवळ गोंदिया-भंडारा मतदार संघात निवडणूक झाली तर कोट्यवधीचा चुराडा होतो आणि इतर मतदार संघात तो होत नाही, असे त्या सामाजिक कार्यकत्र्याला तर वाटत नसावे ना? मग तोच प्रश्न त्या सामाजिक कार्यकत्र्याला सुद्धा लागू पडतो. या याचिकेवर येणारा प्रचंड खर्च तो सामाजिक कार्यकर्ता कुठून करतो, याविषयीच्या अर्थकारणांचा सुद्धा शोध घेतला गेला पाहिजे.
सध्या सुरू असलेल्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष दिल्यास या समाजकारणाला राजकारणाची झालर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. गोंदिया-भंडारा मतदार संघातील सत्ताधारी खासदाराने गेल्या डिसेंबर महिन्यात राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाली. या जागेसह देशात इतर काही जागा रिकाम्या झाल्या. इतर ठिकाणी निवडणुका लागल्या सुद्धा. पोटनिवडणुका घेणे ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. परंतु राज्य सरकारने भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यास केलेली टाळाटाळ एक तर पराभवाचा धसका असू शकते qकवा २०१९ च्या निवडणुकीत ज्या भाजपच्या इच्छूक नेत्याला रिंगणात उतरायचे असेल त्याला ही पोट निवडणूक नकोशी असावी असा कयास वर्तविला जात आहे. देशातील स्थानिक संस्थांपासून सर्वच निर्वाचित जागांसाठी ही प्रक्रिया लागू पडते. मग केवळ भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पैशाचा चुराडा होतो, असे म्हणणे कितपत योग्य आहे.
एखाद्या सामाजिक कार्यकत्र्याला या विषयी काही पाऊले उचलायची होती, तर ती घटनेतील तरतूदींसदर्भात उचलायला पाहिजे होती. पण यामागचे खरे कारण वेगळेच आहे. यामागे त्या सामाजिक कार्यकत्र्याचे अर्थपूर्ण गणित आहे. या कार्यकत्र्याच्या पाठीशी राजकारणी मंडळी असून यात विरोधी पक्षातील काही प्रमुख आणि सत्ताधारी पक्षाच्या नागपूर येथील गटातील नेत्यांनी हातमिळवणी केल्याची कुणकूण लागली आहे. जर ही पोटनिवडणूक झालीच तर सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाèया उमेदवाराचे २०१९च्या तिकिटावरील दावेदारीचा प्रश्न प्रमुख आहे. जर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार ही पोटनिवडणूक जिंकला वा हरला तरी त्याची दावेदारी येत्या २०१९ मध्ये पक्की असेल, हे स्पष्ट आहे. नेमके हेच नागपूरच्या सत्ताधारी गटाच्या पोटातील दुखणे आहे. ही मंडळी आणि प्रमुख विरोधक मंडळी सुद्धा ही पोटनिवडणूक लढविण्याच्या परिस्थितीत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे ही मंडळी आणि विरोधी पक्षातील तथाकथित मंडळी यांच्यात झालेला तह आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा विचार केला तर ही मंडळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील स्वपक्षीय नेत्याला प्रस्थापित होण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी विरोधी पक्षातील काही वजनदार मंडळी यांचेशी संगनमत करून सदर निवडणूक टाळण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
नुकतीच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नागपूरचा गट यांच्यात गुप्त बैठकांची चर्चा जोरात सुरू आहे. अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील एका गुप्त बैठकीतून संयुक्त कार्यवाहीवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. भंडारा लोकसभेची जागा आपल्याच माणसाकडे ठेवण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत.
या चर्चेतून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यामुळे हे प्रकरण वरवर जसे दिसते तसे नसून विरोधी व सत्ताधारी पक्षातील नागपूर येथील गट यांनी आखलेल्या षडयंत्राचा भाग आहे, असे मत काही राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.


...तर संसदच बंद करा : सोनिया गांधी



नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.09 : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (एनडीए)वर शुक्रवारी जोरदार टीका केली. संसदेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या, ”जर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नसेल तर संसद कशासाठी सुरु आहे. ती बंद करा आणि आम्ही घरी जातो”. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव 2018’ आयोजित कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ”भीती आणि धमकी हा आजचा आदेश झाला आहे. सध्या देशात धार्मिक तेढ वाढत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण केले जात आहे. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नसेल तर संसदच बंद का केली जात नाही. त्यामुळे आम्ही घरी जाऊ शकू. आताचे भाजप सरकार वायपेयींसारखे संसद आणि त्याच्या कार्यवाहीचा आदर करत नाही”. तसेच त्या पुढे म्हणाल्या, ”आपल्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...