Wednesday, 20 March 2019

मतदारांच्या जागृतीसाठी शाळा-महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

गोंदिया,दि.20 - येत्या 11 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रित निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी  जिल्हा यंत्रणेद्वारे जाणीव जागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मतदार संघातील शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी 25 व 26 तारखेला निबंध आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने जाणीव जागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत या मतदारसंघातील महाविद्यालय आणि शाळांमध्ये येत्या 25 मार्च रोजी विद्यार्थ्यांची वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. यानंतर 26 मार्च रोजी  शाळेतून प्रथण येणाऱ्या स्पर्धकांची तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. 27 मार्च रोजी तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे विषय "लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांचे मतदान आवश्यक", "आम्ही जागरूक मतदार" आणि  "नैतिक मतदान राष्ट्राकरीता आवश्यक आहे" ठेवण्यात आले आहेत. निंबध स्पर्धेसाठी शब्द मर्यादा 1 हजार 500 शब्दांची असून वेळ 2 तास राहील तर वक्तृत्व स्पर्धेकरीत 5 ते 7 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. दोन्ही स्पर्धा या हिंदी किंवा मराठी भाषेतून राहतील, असे आयोजकांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी  विस्तार अधिकारी एम. एस मोटघरे यांचेशी 9404306225 या क्रमांकावर संपर्क साधावा.

20 ते 26 मार्च बेरार टाईम्स अंक बघण्यासाठी क्लिक कराृ- berartimes.com





Tuesday, 19 March 2019

पेड न्युज, इलेक्ट्रानिक्स व सोशल मिडियाचे सुक्ष्म सनियंत्रण करा


भंडारा,दि. 19 :- लोकसभा निवडणूकीदरम्यान वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या पेड न्युज, इलेक्ट्रानिक्स मिडिया व सोशल मिडियावर प्रसिध्द होणाऱ्या जाहिराती व बातम्यांचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून सुक्ष्म सनियंत्रण करुन पेड न्युज आढळल्यास संबंधिताच्या निवडणूक खर्च खात्यात सदरहू खर्च समाविष्ठ करावा, अशा सूचना निवडणूक खर्च निरिक्षक नाकिडी सृजनकुमार यांनी दिल्या.
जिल्हा माहिती कार्यालय येथे लोकसभा निवडणूकीसाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मिडिया सेंटरचे उदघाटन सृजन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. नोडल अधिकारी निवडणूक खर्च तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, निवडणूक खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी श्रीकांत सुपे यावेळी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरिक्षक सृजन कुमार हे राजस्व सेवेचे अधिकारी असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने त्यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आज त्यांनी मिडिया सेंटरला भेट देवून उदघाटन केले. मिडिया सेंटरच्या माध्यमातून निवडणूक काळात माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्युजवर सनियंत्रण काम केले जाते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी निवडणूक खर्च निरिक्षकांना दिली.
यावेळी बोलतांना सृजन कुमार म्हणाले की, माध्यमात प्रसारित होणाऱ्या उमेदवारांच्या व पक्षांच्या संबंधी बातम्या नियमितपणे सनियंत्रित केल्या जाव्यात. समितीला पेड न्युज आढळल्यास तो खर्च पेड न्युज देणाऱ्या उमेदवाराच्या अथवा पक्षाच्या निवडणूक खर्च खात्यात त्याच दिवशी समाविष्ठ करण्यासाठी निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावा.
यावेळी सृजन कुमार यांनी समितीच्या मार्फत पाठविण्यात येणाऱ्या विविध अहवालांची पाहणी केली व समितीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समितीने या पुढेही नियमित अहवाल सादर करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. निवडणूक खर्च निरिक्षक नाकिडी सृजन कुमार यांचा मोबाई क्रमांक9960303156  हा असून निवडणूक काळात निवडणूक खर्चासंबंधी सृजन कुमार यांच्याशी  संपर्क साधावा.

दोन दिवसात 102 अर्जाची उचल: २ उमेदवारी अर्ज दाखल

       
भंडारा,दि. 19 - भंडारा - गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या   आज दुसऱ्या दिवशी एकूण 26 उमेदवारांनी 55 अर्जाची उचल केली. दोन दिवसात एकूण 46 उमेदवारांनी 102 अर्ज घेतले. आज दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज  दाखल केले आहेतयात पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे भिमराव दुर्योधन बोरकर व सुहास अनिल फुंडे, अपक्ष यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज उचल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहेविकास देवचंद मदनकर भाजपा-1, प्रकाश गणपतराव मालगावे भाजपा-4, पुंडलिक श्यामराव निखाडे ओबीसीएनटी पार्टी2, चनिराम लक्ष्मन मेश्राम अपक्ष-4, सुखराम देशकर भारिप-2, सतिश फुलबांधे अपक्ष-1, डॉ. विजया राजेश नंदुरकर बसपा-2, डॉ. राजेश कवडू नंदुरकर बीएसपी-1, विकास यशवंत गेडाम-1, प्रशांत श्यामसुंदर मिश्रा अपक्ष-1, कुलदिपसिंह विरसिह बाच्छील, प्रहार/अपक्ष-4, रमेश खोब्रागडे अपक्ष-1, अमरदास ईश्वरकर बळीराजा पार्टी-1, प्रमोद हिरामन गजभिये प्रहार संघटना-2, विजय खेडीकर अपक्ष-3, रविशंकर शर्मा अपक्ष-3, राजकुमार भेलावे पिपल्स रिपब्लीक पार्टी-4, महादेव महाजन अपक्ष/भाजपा-2, देविदास लांजेवार विदर्भ आंदोलन समिती-4, अजित राम आस्वले अपक्ष/भाजपा-1, शिल्पा राम आस्वले भाजपा-1, राकेश चोपकर स्वाभिमानी संघटना-1, इंद्रकुमार हेमराज राही काँग्रेस-2, डॉ. सुनिल संपत चवळे अपक्ष-2, गौरीशंकर सुरेश मोटघरे अपक्ष-1 व अतुल शरदचंद्र हलमारे भाजपा/सर्वदलीय/अपक्ष/राजद/एनडीए-4 असे एकूण 26 उमेदवारांनी 55 अर्जाची उचल केली.

मतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही 11 दस्तावेज चालणार

Ø  नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या मतदारांना टप्प्याटप्प्याने वितरण
Ø  मतदार यादीत नाव असणे आवश्यक
भंडारा, दि. 19 : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Register NPR) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (Revenue Generation Index -RGI) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.
ईपीक कार्ड मिळाले नसल्यास...
इपिक कार्ड मिळाले नसलेल्या मतदारांनी जवळच्या मतदार मदत केंद्राशी संपर्क साधावा. तेथे ओळखपत्र मिळण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या निवडणूक आयोगाच्या 1950 या टोल फ्री क्रमांकावर ओळखपत्र मिळण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (Electoral Photo ID Card –ईपिक आयडी) असणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येते. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येते. मतदाराच्या नावात, पत्त्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे.  
नवीन ओळखपत्राचे स्वरुप
यावर्षी आतापर्यंत सुमारे 46 लाख मतदारांसाठी नवीन ओळखपत्र तयार करून वाटपासाठी वितरित करण्यात आले आहे. नवीन ओळखपत्रासाठी मागणी केलेल्या अर्जातील एकूण 98 टक्के मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. 2014 मध्ये टक्केवारी 94 इतकी होती. या ओळखपत्रावर मतदाराचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख, पत्ता, लिंग आणि मतदाराचा विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती छापली आहे. त्याचबरोबर बारकोड असल्यामुळे बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे. हे ओळखपत्र पिव्हिसीपासून तयार केले असले तरी ते स्मार्ट कार्ड नाही.

Monday, 18 March 2019

लोकसभा निवडणूक : पहिल्या दिवशी 47 अर्जाची उचल

गोंदिया दि. 18 – भंडारा – गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज पहिल्या दिवशी 20 उमेदवारांनी 47 अर्जाची उचल केली आहे. आज एकही नामंकन दाखल करण्यात आले नाही.
उमेदवारी अर्ज उचल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे. रामविलास शोभेलाल मस्करे गोंदिया स्वतंत्र बेरोजगार पार्टी-4, दिवाकर जनार्दन मने भंडारा भाजपा-2, शेखर सुर्यभान गभणे अपक्ष-2, जगदिश तुकाराम बोपचे गोंदिया स्वतंत्र-1, टेकचंद शालीकराम बघेले स्वतंत्र-1, सुहास अनिल फुंडे अपक्ष-1, कारु नागोजी नान्हे वंचित बहुजन आघाडी-4, डॉ. मुकेश पुडके अपक्ष-4, विलास जियालाल भारिप-2, सुरेश रामजी भोवते आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया-2, राजेंद्र सहसराम पटले भाजपा-4, देवानंद रामेश्वर गजभिये अपक्ष-4, ओमेश्वर कानुजी वासनिक भाजपा-4, नितीन कुमार प्रल्हाद राऊत बसपा-2, अभय तेवाजी रंगारी बहुजन मुक्ती पार्टी -2, राजु रामभाऊ निर्वाण स्वतंत्र-2, मुनिश्वर दौलत काटेखाये अपक्ष-2, विरेंद्रकुमार कस्तुरचंद जयस्वाल अपक्ष-1, तारका देविदास निपाने पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक-2 व नितीन पुंडलीक तुमाने अपक्ष-1 यांचा अर्ज उचल करणाऱ्यामध्ये समावेश आहे.

नाकाबंदी करणाऱ्या पोलीस शिपायास कारचालकाने चिरडले


गडचिरोली दारूबंदी असलेला जिल्हा असल्याने इतर जिल्ह्यातून दारू व रसद पुरवठा होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तसेच ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे. गडचिरोलीवरून जात असताना आरमोरी शहराच्या वेशीवर नाका लावण्यात आला आहे. या नाक्यावर आरमोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवस-रात्र तैनात आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलीस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना नागपूरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने नाक्यावर वाहन न थांबवता आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस केवळराम येलोरे यांना जबर धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर कारचालक मोरेश्वर वामन हेडाऊ (रा. गोकुलनगर) गडचिरोली याला अटक करून (एमएच ३३, ८८८) या क्रमांकाची कार ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर हेडाऊ हा गडचिरोली येथील एका नामांकित व्यवसायिकाचा ड्रायव्हर असून तो आपल्या मालकाला नागपूर येथे सोडून गडचिरोली परत येत होता.
दरम्यान, दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन आणून त्याने पोलीस शिपायाच्या अंगावर चढविले. मृत पोलीस शिपाई गणेशपूर येथील रहिवासी असून ते आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून ठाणेदाराचे रायटर म्हणून काम पाहत होते.रविवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधिक्षक बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हजर होते.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...