Wednesday, 1 April 2020

विस्थापित, बेघर व भिकारी आढळल्यास निवारागृहात पाठवा- जिल्हाधिकारी


भंडारा, दि. 01 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर व भिकारी जिल्ह्यात कुठेही आढळल्यास तात्काळ सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील निवारागृहात त्यांची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात 9 ठिकाणी निवारागृहे (शेल्टर होम) सुरू करण्यात आले आहेत, या निवारागृहात 700 नागरिकांची राहण्याची व्यवस्था आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ही सोय करण्यात आली आहे. भंडारा 4, लाखनी 2, साकोली, तुमसर, लाखांदूर व पवनी प्रत्येकी एक अशा 9 वसतिगृहात निवारागृह तयार करण्यात आले आहेत.
विस्थापित, कामगार, बेघर व भिकारी व्यक्तीची राहण्याची अथवा जेवणाची सोय नाही व्यकींना निवारागृहात ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्याशी संपर्क साधून गरजूंची तात्काळ व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अन्न मिळेल याकडे जातीने लक्ष पुरवावे असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा कार्यालयाने गरीब व गरजू व्यकींना वितरीत करण्यासाठी 14 क्विंटल तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. हा तांदूळ तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला अजून गरजूंना तांदुळ वाटपाचे काम प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांचे मार्फत सुरू आहे. मागणी वाढल्यास तांदूळ पुरवठा केला जाईल.
लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, त्या नुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष तसेच अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
विविध ठिकाणाहून येणाऱ्या विस्थापित व बेघर नागरिकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्या कडे आहे. त्या स्वतः जातीने व्यवस्था पाहत आहेत. निवारागृहातील नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा, नास्ता, गरजूंना कपडे, सॅनिटायझर, ब्रश, साबण, तेल इत्यादी वस्तू पुरविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवूनच सर्व व्यवहार केले जातात. नागरिकही हा नियम कसोशीने पाळतात. आरोग्य विभागाच्या वतीने आज येतील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

कोरोनाच्या धोक्याला घाबरू नका, काळजी घ्या- खा. अशोक नेते यांचे आवाहन


देवरी,दि.01 : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण भारत हादरलेला आहे व सर्व नागरिकांना घरीच रहावे लागत आहे. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने याचा मुकाबला करून आपली काळजी घ्यावी तसेच गरीब नागरिकांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले आहे.
खा.नेते यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंमलात आणली आहे. या योजनेतून गरीब, शेतमजूर व कामगार वर्गाच्या मदतीसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या विशेष पैकेजची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
या योजनेतंर्गत ८० कोटी शेतमजूर, गरीब परिवारासाठी पुढील ३ महिन्यापर्यंत १० किलो तांदूळ किंवा गहू व १ किलो डाळ स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेच्या खाताधारक महिलांना ३ महिने पर्यन्त ५०० रुपयांचे अनुदान तसेच उज्जला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना ३ महिने पर्यंत मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. रोहयो कामावरील मजुरांची मजुरी १८२ वरून २०० रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकर्‍यांना एप्रिल महिन्यात २ हजार रुपये मिळणार आहेत. वरिष्ठ नागरिक , दिव्यांग नागरिक व विधवा महिलांसाठी ३ महिन्यापर्यंत १००० रुपये देण्यात येणार आहेत, महिला बचत गटांना कर्ज घेण्याची मर्यादा १० लाख वरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. कोरोना महामारीसाठी सेवा करीत असलेल्या २२ लाख आरोग्य कर्मचार्‍याकरीता ५० लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. या सर्व योजनांचा लाभ गरीब नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले आहे

मुंबईत रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण, २५ पोलीस कर्मचारी क्वारंटाइन



मुंबई (वृत्तसंस्था),दि.01 : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका हवालदाराला कोरोना विषाणुची लागण झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित कॉन्स्टेबल कल्याण (पश्चिम) येथील रहिवासी आहे.
दरम्यान, १५ मार्चपासून ते २७ मार्चपर्यंत या पोलीस कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्या २५ पोलिसांची देखील तपासणी करण्यात आली आहे. २५ पोलीस कर्मचा-यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ३० मार्च रोजी पोलीस कॉन्स्टेबलला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचा खोकलाही वाढला होता. त्यामुळे त्याला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
येथे उपचार घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यासोबत १५ ते २२ मार्च काळात सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि २४ ते २७ मार्च काळात लॉकअप गार्ड येथे संपर्कात आलेल्या २५ पोलीस कर्मचा-यांची देखील तपासणी करण्यात आली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गोंदियात शासकीय अलगीकरन कक्षात 35 व्यक्ती


गोंदिया,दि.01 ::कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये 244 प्रवासी विदेशातून प्रवास करून आलेले होते. या व्यकतींच्या संपर्कात 945 व्यक्ती आढळून आलेल्या होत्या.त्या सर्वांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करण्यात आले होते.त्यापैकी 166 प्रवाशांचा 14 दिवसाचा अलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे.सध्या शासकीय अलगीकरण कक्षात 35 व्यक्ती उपचार घेत आहे.
१ एप्रिल २०२० पर्यंत तर विदेशातून आलेले 78 प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 379 व्यक्तींचे त्यांच्या  वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करण्यात आहे.ते सर्व व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने 18 नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी 17 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत व एक नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेला आहे.
विदेशातून आलेल्या ज्या प्रवाशांचे अलगीकरण केले आहे त्या प्रवाशांना नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथून दररोज फोनद्वारे त्यांच्या घरातील उपस्थितीबाबत तसेच वैद्यकीय पथकाने भेट दिली किंवा नाही याबाबत चौकशी करण्यात येत आहे.त्याच बरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे संबंधित प्रवाशांच्या सद्यस्थितीबाबत फोनद्वारे विचारणा करण्यात येते.अन्न व औषध प्रशासनाने मास्क व हॅन्ड सॅनिटायझरबाबत एकूण 8 निरीक्षणे नोंदवली आहे. तसेच दोन दुकानांवर जास्त किंमत आकारल्याबद्दल आणि खरेदी व विक्रीचे व्यवहार सादर न केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे.

दिल्लीच्या जमातवरून परतलेले शेकडो लोक महाराष्ट्रात



मुंबई,दि.01. देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. यातच दिल्लीतील निझामुद्दीन येथील ‘तबलिकी-ए-जमात’चा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 345 लोक सहभागी झाल्याचे समजते आहे.


यवतमाळमध्ये 12 संशयित
यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. तशी यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले 5 जण परत आले असून त्यांना क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 7 जण अद्यापही जिल्ह्यात परत आले नाही. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबल्याची शक्यता आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.भंडारा येथील दोघांनाही क्वारटाईंन करण्यात आले आहे.
पुण्यातील 136 जण सहभागी
पुणे विभागातील तब्बल 182 जण ‘तबलिकी-ए-जमात’ला सहभागी झाले होते. यातील 132 जण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील होते. 182 पैकी 106 जण मिळून आले असून उर्वरित लोकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले. तर कोल्हापुरातून 21 भाविक सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर, नांदेड, ठाणे, सातारा, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातील भाविक सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ‘तब्लिग जमात’ हे देशातील ‘कोरोना’चे मोठे हॉटस्पॉट असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.अहमदनगरमध्ये पाच कोरोनाग्रास्तांपैकी दोन परदेशी रुग्ण हे ‘तबलिग जमात’चे सहभागी आहेत. तर अन्य 3 पॉझिटिव रुग्ण हे सहभागींच्या संपर्कातून बाधित झाले आहेत.

औरंगाबादमधून 47 भाविक




या कार्यक्रमासाठी औरंगाबादमधून 47 भाविक सहभागी झाले होते. आतापर्यंत यातील 40 जणांची तपासणी केली गेली असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर सात जणांना क्रांती चौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात भरती केले. तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सातपैकी सहा जणांनी एका लग्नाला हजेरी लावली होती.

‘तबलिकी-ए-जमात’मध्ये महाराष्ट्रातून कुठून किती भाविक?

पुणे, पिंपरी चिंचवड – 136, औरंगाबाद– 47,अहमदनगर – 34 (29 परदेशी नागरिक),कोल्हापूर – 21,नवी मुंबई – 17,सोलापूर – 16,नाशिक – 15,मुंब्रा (ठाणे)- 14,नांदेड – 13,यवतमाळ – 12,सातारा – 7,उस्मानाबाद – 6,सांगली – 3,चंद्रपूर – 1, भंडारा -2,वाशिम-1 एकूण – 345

01 ते 07 एप्रिल 2020 बेरार टाईम्स अंक,berartimes.com ला क्लिक करा ताज्या बातम्यासांठी





Tuesday, 31 March 2020

मुख्यमंत्र्यासह सर्व लोकप्रतिनिधीचे ६० टक्के तर अधिकारी कर्मचार्याचे ५० टक्के वेतन कपात-उपमुख्यमंत्री पवार


मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. 
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...