Saturday, 4 August 2018

९0 फूट राहणार मेट्रो एयरपोर्ट स्टेशनची उंची




नागपूर,दि.04ः-अर्बन आर्किटेरवर आधारित महा मेट्रो नागपूरचे एयरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९0 फूट असेल. शहरात पहिल्यांदाच अश्याप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. योजना स्टेशनवरील मोकळ्या जागेत सुरक्षासंदर्भात सर्व उपकरने हाताळली जात आहे. एयरपोर्ट स्टेशनवरील प्लॅटफॉर्म ७७.५ मीटर लांबीचा असणार आहे. प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) म्हणजे धातूंच्या साह्याने कारखान्यात तयार केलेल स्ट्रर असून, त्याची कार्यस्थळावर नेऊन उभारणी करणे होय.
मेट्रोच्या साऊथ एयरपोर्ट ते एयरपोर्ट स्टेशन पयर्ंत असणार्‍या एलिवेटेड सेक्शनवर तयार झालेल्या मेट्रो रुळाचे(ट्रॅक) परीक्षण नुकतेच महा मेट्रो अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. बुलंद इंजिनच्या साह्याने हे परीक्षण झाले आहे. एयरपोर्ट स्टेशनलगतच्या प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) च्या संरचनेवर काम सुरू असून याच्या बांधकामात धातू आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. फॅक्टरीत तयार झालेले प्री-कास्ट स्ट्रर एयरपोर्ट स्टेशनवर आणून बसविले जाणार आहे. आकर्षक पांढर्‍या रंगाच्या प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) उभारणीकरता विविध प्रकारच्या जड आणि हलक्या साहित्यांचा वापर होणार आहे. कॉलम आणि बीमचे कार्य पूर्ण झाल्यानंतर काँक्रीट पासून स्टेशनची उंची १६.७८ मीटर असेल. एकूण २१0८ चौरस मीटर इतक्या जागेवर हे प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग उभारल्या जात आहे.
एयरपोर्ट स्टेशनवरील कार्ये पूर्ण करत असताना विविध साहित्यांची कटिंग, साहित्यांना आकार देने, साहित्यांना एकत्र करणे व वेल्डिंग सारखे कार्य केले जाते. हि सर्व काम आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाने आवश्यक त्या नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण केली जात आहे. नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
एक अनुभवी सर्मपित अधिकार्‍यांची आणि कर्मचार्‍यांची फौज हे संपूर्ण कार्य करणार आहे. प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) स्टेशनची संपूर्ण रचना आधुनिक संरचनेवर आधारित आहे. ज्यामध्ये विशेषत: डिझाइन केलेले आकर्षक बोल्ट्सचा उपयोग करण्यात आले आहेत. आधुनिक शैलीने स्टेशनचे बांधकाम होत असल्याने त्याचा एकूण खर्च ४0 टक्क्याने कमी असेल. तसेच पारंपारिक बांधकामात विटा, लाकूड, रेती व ग्लेझिंगचा वापर देखील होत आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे

यवतमाळ,दि.04 : शिक्षकाने आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि.3) उघडकीस आली. सतीश जाधव (वय 31) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
येथील आश्रमशाळेत ग्रामीण भागातील होतकरू मुले-मुली शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. दरम्यान, दुपारचे जेवण झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनी वर्गात फळ्यावर लिहीत असताना आरोपी शिक्षकाने मागून येऊन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करताच आरोपीने तिला मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने अधीक्षिकेकडे तक्रार केली असता आणखी दोन मुलींसोबत हा प्रकार झाल्याचे पुढे आले. त्यानंतर बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

देवरीच्या केशोरी तलावात प्रेत आढळले

देवरी,दि.4- स्थानिक केशोरी तलावामध्ये एका इसमाचे प्रेत तरंगताना आढळले. या प्रकरणी देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मृताचे नाव प्रकाश शालिकराम टेकाम (वय50), राहणार संजय नगर देवरी असे आहे.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रकाश हा गेल्या मंगळवारला (दि.31) आठवडी  बाजार करून घरी परतला. यानंतर तो घरून परत येतो असे सांगून निघून गेला. मात्र, तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी प्रकाशचा शोध घेतला. मात्र तो कोठेही आढळून न आल्याने त्याच्या नातेवाइकांनी देवरी पोलिसात हरविल्याची तक्रार दिली.
काल शुक्रवारला (दि.3) सायंकाळी साडे सातच्या सुमारास स्थानिक केशोरी तलावात एका इसमाचे प्रेत तरंगताना दिसले असता त्यांची याची सूचना देवरी पोलिसांना दिली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यावर पोलिसांनी प्रेताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता प्रकाशच्या कुटंबीयांनी त्याचा मृतदेह  ओळखला. पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे मार्गदर्शनात देवरी पोलिस करीत आहेत.

Wednesday, 1 August 2018

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या भाजपा आमदारांची बैठक

मुंबई,दि.01(वृत्तंसस्था) आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षणामुळे आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. ही बैठक गुरुवारी दुपारी दोन वाजता होणार असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत आरक्षण आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

 मराठा आरक्षणाचा मुद्दा तापून आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलावून मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका निश्चित केली. मात्र भारतीय जनता पक्षाकडून मराठा आरक्षणाबाबत आपल्या आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आलेले नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आरक्षण जाहीर करण्यास मुद्दाम चालढकल करत असल्याचा समज मराठा समाजात निर्णाण झाला असून, त्यामुळे भाजपविरोधात संताप वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने तिला महत्त्व आले आहे.

आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय संयुक्त सभा

देवरी,दि.01 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांतील प्राचार्य मुख्याध्यापाकांसह शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि प्रकल्पातील सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त सभा प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.
अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. या वेळी समितीचे सदस्य तथा नगराध्यक्ष कौशल कुंभरे, आनंद नळपते, शंकर मडावी यांच्यासह सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक, शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य राहण्याच्या दृष्टीने व्यसनमुक्ती कार्यक्रम प्रत्येक महिन्यात राबवावे, व्यसनांपासून होणाºया दुष्परिणामांची चित्रफीत दाखवून सर्व शाळा व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे, आदिवासी विद्यार्थ्यांना आयपीएस, आयएएस होण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे व त्यासाठी स्वतंत्र वाचनालय तयार करुन तेथे एनबीद्वारे पुस्तके देण्यात यावे, असे निर्देश आ. संजय पुराम यांनी दिले.
तसेच विद्यार्थी मृत्यू प्रकरण शून्य ठेवण्याच्या दृष्टीने व शाळेत विद्यार्थ्यांवर अत्याचाराबाबद कोणतीही घटना घडणार नाही, याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावी. विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकीन वेळेवर पुरविण्याचे आदेश आ. पुराम यांनी दिले.डीबीटीमुळे विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांचे चांगले मत आहे. या डीबीटीमध्ये अजून एक हजार रुपये वाढविले तर चांगले होईल. या विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक व संचालन प्रकल्पाचे नियोजन अधिकारी एस.एस. देवगडे यांनी केले. आभार ककोडी येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम. एन. शहारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी (अनुदानित शाळा) एल. एच. भोंगाडे, सहायक प्रकल्प अधिकारी व्ही.एम. टेंभुर्णीकर, सहायक प्रकल्प अधिकारी एस.वाय. खोटेले, उपलेखापाल पी.सी. डोळस, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.के. गाते व एस.जी.तोरकड यांनी सहकार्य केले.

BERAR TIMES: 01 ते 07 आॅगस्ट बेरार टाईम्स चा अंक बघण्यासाठी क्ल...

BERAR TIMES: 01 ते 07 आॅगस्ट बेरार टाईम्स चा अंक बघण्यासाठी क्ल...

01 ते 07 आॅगस्ट बेरार टाईम्स चा अंक बघण्यासाठी क्लिक करा





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...