Friday, 1 March 2019

पोलीस पाटलांच्या मागण्यावर आचारसहींतेपुर्वी निर्णय घेणार मुख्यमंत्री

मुंबई,दि.28ः-राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्या व इतर विषयांना घेऊन बुधवारला(दि.27) विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉ.परिणय फुके यांच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली.त्या बैठकीला प्रामुख्यांने बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा हे सुध्दा उपस्थित होते.तर या बैठकीमध्ये विदर्भ पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दिपक पालिवाल, उपाध्यक्ष पिंटू निंबाळकर, गाव कामगार पोलीस पाटील संघटना अध्यक्ष पंढरीनाथ पाटील,भिकाजी पाटील,भृंगराज परशुरामकर, श्रमिक पोलीस पाटील संघटना अध्यक्ष उगे पाटील, महासंघ पोलीस पाटील संघटना अध्यक्ष नागराज गोजे पाटील व इतर पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत आचारसहिंतुपुर्वी पोलीस पाटलांच्या मागण्यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बैठकीत पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, सेवानिवृत्ति योजना सुरु करुणे सोबतच 2 लक्ष रु देण्यात यावे, दर 10 वर्षानी होणारे नुतनिकरण बंद करण्यात यावे, पोलीस पाटील पदावर असताना नैसर्गिक किवा अपघाती मृत्यु झाल्यास वारसांना अनुकंप तत्वावर नौकरी देण्यात यावी, पोलीस पाटिल भरती वेळी पोलीस पाटलांच्या वारसांना अनुभवाच्या आधारावर 10 अतिरिक्त गुण देण्यात यावे अशा मागण्यावर सकारात्मक निर्णय आचार सहींतेपुर्वी घेण्चेया आश्वासन देण्यात आले.

2 व 3 मार्च मतदार नोंदणी विशेष मोहिम




गोंदिया,दि. 28 :- भारत निवडणूक आयोगाचे 27 फेब्रुवारी 2019 च्या पत्राच्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेवून नुकत्याच पार पाडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत  मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून 2 व 3 मार्च 2019 या दिवशी गोंदिया जिल्हयातील अर्जूनीमोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार केंद्रावर विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी 2 व 3 मार्च 2019  रोजीच्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत 18 व 19 वयोगटातील मतदार आणि दिव्यांग मतदार यांनी जास्तीत जास्त सहभागी होउुन आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खातरजमा करावी व मतदार यादीत नाव नसल्यास आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जाऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन दयावे. तसेच माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2018 मध्ये आपले नाव मतदार यादीत समाविष्ट,दुरुस्ती करण्यासाठी विहित नमूने भरुन देण्यात आले होते त्यांचे निवडणूक ओळखपत्र प्राप्त झाले आहे ते संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. नागरिकांनी या विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्यावा व या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास गोंदिया जिल्हा संपर्क केंद्रातील दुरध्वनी क्रमांक 1950 ( टोल फ्री ) वर संपर्कसाधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंत्री, विरोधी पक्षांचे नेते, प्रधान सचिव यांना साकडे

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यां व प्रश्नांसंदर्भात मंत्रालय व विधानभवन येथे मंत्री, विरोधी पक्षांचे नेते, प्रधान सचिव यांना निवेदन देत आपले ग्रहाणे मांडून साकडे घातले आहे.
यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. तसेच कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, लवकरात लवकर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावू देऊ असे सांगितले. महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर म्हणाले की, राज्यातील सर्व आस्थापने वरील तसेच बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहे त्या पदावर कायम समायोजन करावे, तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला प्रमाणे समान काम, समान वेतन देण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे स्पष्ट केले. महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, संपूर्ण राज्यात 05 लाख कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व विभागात काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. वर्षानुवर्षे त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी परमनंट केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल. कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, विविध महानगरपालिका आदी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर, कार्याध्यक्ष  सचिन जाधव, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, सचिव बाबासाहेब कोकाटे, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, महिला अध्यक्ष माधुरी थोरात, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील सह आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

२८ कोटीचा अर्थसंकल्प,जि.प.सदस्य विकास निधीत वाढ

गोंदिया, दि.२८ – गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा सुधारीत व २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प आज स्व.वसंतराव नाईक सभागृहात आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत अर्थ सभापती हमीद अल्ताफ अकबर अली यांनी सादर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले, मुख्य लेखा वित्त अधिकारी अनंत मडावी उपस्थित होते.
सदर अर्थसंकल्पात या वेळी सन २०१८-१९ चा ३३ कोटी ४१ लाख ९३ हजार रुपयांचा सुधारित तर सन २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रूपयांचा संभावित अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.या वेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, रमेश चुºहे, पी.जी.कटरे, सुरेश हर्षे, उषा शहारे, उषा मेंढे या सदस्यांनी बांधकामासाठी करण्यात आलेल्या निधीत कपात करुन तो निधी कृषी आणि पाणी पुरवठा विभागासाठी वाढविण्याची मागणी केली. सेंद्रिय शेती व तसेच कृषी विषयक योजनांवर भर देण्याची मागणी केली
जिल्हा परिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करीत ८ लाख रुपये करण्यात आले.त्याचप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शाळात पिण्याचे पाणी व शौचालयासाठी २० लाख,तर जिल्ह्यातील एकमेव अंतरराष्ट्रीय दर्जाची शहीद जाम्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल गोेरेगावच्या विकासासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करुन ५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनेसाठी ८६ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली.अपंगासाठीच्या योजनेसाठी १७ लाख रुपये,महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनेसाठी १३९.४० लाख रुपये,ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी १५० लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.पशुसंवर्धन विभागाकरीता दुध काढण्याचे यंत्र व देशी दुधाळ गोवंश वाटप करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यात आले असून विभागाला १०२.८५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली.सामान्य प्रशासन विभागातंर्गत कंत्राटी वाहन चालकाचे मानधन,पंचायत विभागातंर्गत महाऑनलाईन संगणक ऑपरेटरचे थकित मानधन देण्यासाठी नविन लेखाशिर्ष तयार करण्यात आले.तर लघु पाटबंधारे विभागाकरीता १९९ लाख रुपयाची तरतूद या अर्थंसंकल्पात करण्यात आल्याची माहिती अर्थसभापती हामिद अल्ताप अली यांनी सभागृहात दिली.
जिल्हा निधी अर्थसंकल्प हा जिल्हा परिषदेला प्राप्त होणाèया उत्पन्नावरच आधारित आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत आहे. जिल्हा परिषदेला प्रामुख्याने मुद्रांक शुल्क, सामान्य उपकर, वाढीव उपकर सापेक्ष अनुदान, वन अनुदान व शासनाकडून प्राप्त आणि शिल्लक अनुदानातून केलेली अल्प गुंतवणुकीतील प्राप्त व्याज इत्यादी मार्गाने उत्पन्न प्राप्त होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार या उत्पन्नातून मागासवर्गीयांसाठी २० टक्के निधी, महिला व बालकल्याणासाठी १० टक्के निधी, दिव्यांगाकरीता ३ टक्के निधी व पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्तीसाठी २० टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार अंदाजपत्रकीय तरतुदी करुन विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सभापती हमीद अल्ताफ अली म्हणाले.

भांडुप येथे ‘भांडुप कलाकार कट्टा’तर्फे’मराठी भाषा दिनानिमित्त’ विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, (शेखर भोसले) दि.28 - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच हे वर्ष कविवर्य ग.दि.माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि लेखक पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. या दुग्धशर्करा योगावर भांडुप कलाकार कट्टा तर्फे एकपात्री नाट्यप्रयोग, कविता सादरीकरण, मराठी कथा अभिवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन (अखिल बुक्स सर्विसेस ह्यांच्या सौजन्याने) बुधवार(दि.२७) सायं. ६:०० ते ९:०० ह्या वेळेत कोकण नगर व्यायम शाळा पटांगण, भांडुप (प.) येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाअंतर्गत भांडुप कलाकार कट्ट्यातील नवोदित कवी हर्षद सुतार, अतुल गुरव, नीलेश वायंगणकर, अशोक परब, श्रुती घोसाळकर, सुप्रिया सुर्वे, नीलम, मनोमय , अनघा हडकर सौ.लक्ष्मी मुंढे यांच्या कविता सादर करण्यात आल्या. तसेच काही नाट्यप्रवेश, स्वगत, अभिवाचन देखील सादर करण्यात आले.नाट्यरसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपरोक्त कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच अखिल बुक्स सर्विसेस ह्यांच्या सौजन्याने आयोजित ख्यातनाम साहित्यिकांच्या पुस्तक प्रदर्शनाचा देखील वाचन प्रेमी भांडुपकरांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाला जेष्ठ नाट्य, सिने अभिनेत्री, लेखिका, कवीयत्री सौ. ज्योती निसाळ, ‘अप्सरा आली फेम’ ऋतुजा प्रमोद राणे, साहित्यिक डॉ. विवेका टाकळे, अभिवाचक – स्वप्नील फडके, गायक- प्रसाद पटवर्धन या प्रमुख अतिथींची उपस्थिती लाभली. भांडुप मधील राजकारण, समाजकारण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हे देखील या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते.भांडुप कलाकार कट्ट्याच्या कलाकारांनी एकत्र येवून भांडुपमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त प्रथमच अश्या प्रकारचा एक सुंदर साहित्यिक कार्यक्रम साजरा केला याबद्दल ह्या कट्ट्याच्या कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी निवेदक, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, कवी, लेखक आणि इतर सर्व कलाकारांनी गेले काही दिवस प्रचंड मेहनत घेतली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात भांडूप कलाकार कट्ट्याचे अध्यक्ष श्री महेश तावडे व त्यांचे इतर साथीदार सर्वश्री विश्राम चव्हाण, नयन पडवळ, रोहन सवने, समीर नार्वेकर, अभिजित महाडिक, सुहास बागवे, निखिल चव्हाण, संदीप मसूरकर, जयेश चाळके, नीलेश गुंडाळे, राजेश आयरे, प्रथमेश कदम, प्रणय शेट्ये, प्रमोद राणे, पूर्णिमा पोळ, मीनाली महागावकर, गीता सूर्यवंशी, शुभांगी कांबळे, इत्यादी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

ओबीसी संघटना घालणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

गडचिरोली,दि.28ः– राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा देसाईंगजच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ओबीसी समाजाच्या मागण्या 2019 च्या लोकसभा निवडणुकापुर्वी मान्य न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ओबीसी समाजाची जनगणना घोषीत करण्यात यावी. गावांचे पुनर्निरिक्षण करुन फेररचना करण्यात यावी. अनुसूचित  जमातीची लोकसंख्या 50 टक्यापेक्षा कमी असलेल्या गांवाना पेसातून वगळण्यात यावे. गडचिरोली जिल्ह्यात वर्ग 3 व 4 साठी असलेले 6 टक्के ओबीसी आरक्षण रद्द करुन 19 टक्के पुर्ववत करण्यात यावे, यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात 19 टक्यापेक्षा कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यात यावे. अन्यथा लोकसभा निवडणुकीवर ओबीसी समाज बहिष्कार घालणार अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना रमाकांत ठेंगरे जि प सदस्य गडचिरोली , प्रा. शेषराव येलेकर उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, प्रा. दामोदर शिंगाडे, लोकमान्य बरडे अध्यक्ष देसाईगंज तालुका, पंकज धोटे सचिव, जितेंद्र ठाकरे अध्यक्ष आरमोरी तालुका, हिरालाल शेंडे, शंकर पारधी, दीपक प्रधान, सुरज लोथे, इत्यादी उपस्थित होते.

आज मंत्रालयात होणार श्रीरामपूरवासीय प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यावर चर्चा

गुरुवारचीही रात्र काढणार प्रकल्पग्रस्त जंगलातच
सामाजिक संघटनानी पुरविले अन्नधान्य
 
गोंदिया,दि.२८ः मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सौंदडजवळील वनविभागाच्या जागेवर पुनवर्सित करण्यात आलेल्या श्रीरामपुरवासियांनी आमच्या सर्वच समस्यांचे समाधान करा अन्यथा आम्हाला आमच्या गावीच जाऊ द्या हा नारा देत सोमवारपासून आपल्या मूळ गावाकडील रस्त्यावर ठाण मांडला आहे.कवलेवाडा,कालीमाती व झंकारगोंदी ही जंगलातील गावे नव्याने अस्तित्वात आलेल्या  नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात आल्याने त्यांचे पुनवर्सन 7 वर्षाआधी  करण्यात आले. सोयीसुविधा मात्र पुरविण्यात न आल्याने कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारदेवी येथील सहाशेच्यावर गावकèयांनी सोमवारला गावाकडे कूच केली होती.सोमवारी निघालेल्या या गावकèयाना पोलीस व वनविभाग प्रशासनाने तारेचे कुंपन लावून वाटेतच अडविले आहे. सोमवार,मंगळवार,बुधवार व आज गुरुवारची रात्रही त्यांची जंगलातच जाणार असून जोपर्यंत ठोस निर्णय लागत नाही,तोपर्यंत परतणार नाही ही भूमिका घेतली आहे.या प्रकल्पग्रस्तांना गेल्या चार दिवसापासून वनविभागाचे उपवनसंरक्षक युवराज व वन्यजीव विभागाचे प्रकल्प संचालक समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर मंत्रालयालाही त्याची दखल घेण्याची वेळ आली असून उद्या शुक्रवारला(दि.01)मुंबई मंत्रालयात या विषयावर उच्चस्तरिय बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्या बैठकीत काय निर्णय होते,त्याकडे लक्ष लागले असून त्या बैठकीनंतरच प्रकल्पग्रस्त काय भूमिका घेतात हे ही ठरणार आहे.
बुधवारला आपल्या गुप्त दौर्यात आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदियातील एका पक्षकार्यकर्त्याच्या घरी भेटीगाठी करीत परतीच्या प्रवासाला निघाले.मात्र प्रकल्पग्रस्तांच्या ठिकाणी गेले नाही त्यांची विचारपूस केली नाही.तर त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांना पाठविले होते.त्यांनाही प्रकल्पग्रस्तांनी एैकले नाही.शेवटी मंत्रालयात वनमंत्री व अधिकारी यांच्यासोबत बैठक करुन देण्याचे पुढे करुन पुनर्वसीत श्रीरामपूरचे सरपंच भरत पंधरे व इतरांना मुंबईला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले.मात्र जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे या अद्यापही त्या ठिकाणी पोचलेल्या नाहीत.
उपवनसंरक्षक युवराज व नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प संचालकानी श्रीरामपूर पुनर्वसितांना आपल्या मागण्या शासनाकडे पोचविल्या आहेत.त्या मंजूर करण्याचे अधिकार आमचे नसल्याने आम्ही फक्त आश्वासन देऊ शकतो काही करु शकत नाही असे चर्चा करतांना सांगितल्याने प्रकल्पग्रस्तांनीही जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही,तोपर्यंत न हटण्याचा निर्णय घेतला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाटी, झंकारगोंदी हे ३ गाव वनपरिक्षेत्रात येत असल्यामुळे सन २०१२-१३ ला या ग्रामस्थांची पुनर्वसन  श्रीरामपूर  येथे करण्यात आले. मात्र. मोबदल्यात फक्त ८ लाख देण्यात आले आहे. उर्वरित २ लाख, शेती व पुनर्वसन प्रमाणपत्र टप्प्याटप्य्याने देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. मात्र, त्याला ७ वर्ष लोटूनही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या बिèहाडासह आपल्या मूळ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना रोखण्यात आले. जो पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत परत जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.सन २०१२-१३ मध्ये त्यांना गावातुन बाहेर काढत कोहमारा-साकोली मार्गावरील सौंन्दड जवळील ठिकाणावर पुनवर्सन करण्यात आले.
गेल्या चार दिवसापासून त्याठिकाणी शेक़डोच्या संख्येने महिलापुरुष आपल्या मुलाबांळासह ठाण मांडून बसले आहेत.पिण्याच्या पाण्यापासून अन्नधान्याची सोय आता सामाजिक संस्था करु लागले आहेत.विविध राजकीय पक्षाचे पुढारी त्याठिकाणी जाऊन त्यांची विचारपूसही करु लागले आहेत.
मंत्रालयात उद्या बैठक-उपवनसरंक्षक युवराज
पुनर्वसित श्रीरामपूर येथील प्रकल्पग्रस्तांना आपण समजवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला मागण्या आपल्यास्तरावरच्या नाहीत.त्यामुळे या मागण्यावर चर्चा करण्यासाठी उद्या मुंबई मंत्रालयात प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी ,पालकमंत्रीसह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यात काय तोडगा निघेल त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसरंक्षक युवराज यांनी दिली.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...