Tuesday, 1 October 2019

उध्दवजीच्या आदेशावर पक्षासाठी काहीही करायला तयार-मुकेश शिवहरे




गोंदिया,दि.01-गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजप-सेनेच्या युतीमध्ये सेनेकडे असलेली गोंदिया विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपच्या कोट्यात गेल्याने शिवसेनेकडून एकमेव दावेदार असलेले जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांना मात्र शांत बसण्याची वेळ आली आहे.
सेनेकडून ही जागा भाजपकडे गेल्यानंतर बोलतांना शिवहरे यांनी आपली निवडणुक लढायची पुर्ण तयारी झालेली होती.गावागावामध्ये पक्षसंघटन बुथस्तरावर तयार करण्यात आले होते.लोकसभा निवडणुकीतही शिवसैनिकांनी मनापासून काम केल्यानेच गोंदिया मतदारसंघात वाढ मिळालेली होती.मात्र युतीच्या जागावाटपात जिल्ह्यातील एकमेव असलेली ही जागा गेल्यानेही मोठे दुःख झाले असून पक्षाचा हा निर्णय स्थानिक कार्यकत्र्यासांठी मात्र धोकादायक ठरला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय सर्वत्तोपरी मान्य असून आपण पक्षप्रमुखासांठी काहीही त्याग करायला तयार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी सांगितले.शिवसैनिक अंखड महाराष्ट्र व qहदुत्वाच्या मुद्यावर काम करीत असून उध्दवजीने घेतलेल्या निर्णयाचा आदर करीत आम्ही युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा धर्म पाळू यात कुठलीही शंका कुंशका नसल्याचे शिवहरे म्हणाले.

आ.गोपालदास अग्रवालांनी दाखल केला नामांकन




गोंदिया,दि.01-काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारला मुहूर्ताचा उमेदवारी अर्ज गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी वंदना सवरंगपते यांच्याकडे सादर केला.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उमादेवी अग्रवाल,विशाल अग्रवाल,प्रफुल अग्रवाल,पराग अग्रवाल,डॉ.विजय बहेकार,छैलबिहारी अग्रवाल,अपुर्व अग्रवाल,महेश अग्रवाल,सुरेश अग्रवाल,राकेश ठाकूर,अजय गौर,भागवत मैश्राम,एड.प्रमोद फुंडे,प्रकाश रहमतकर,कमल पुरोहित,गोपाल एच.अग्रवाल आदी उपस्थित होते.

भाजप नेते विनोद अग्रवाल भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

गोंदिया,दि.०१ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहिलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी निवडणुक लढविण्याची घोषणा केली असून ते ३ आँक्टोबंरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विनोद अग्रवाल यांनी आपण जनतेचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे म्हटले आहे.त्यासाठी आज मंगळवारला येथील जलाराम लान येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला उपस्थित नेते व पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.३० ते ४० हजार भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु झाली असून भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराला कुठल्याही परिस्थितीत सहकार्य न करण्याची भूमिका पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी घेतल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेकडूनही 70 उमेदवारांची यादी जाहीर

अनेक आयारामांचे नशिब फडफडले

मुंबई, दि.01 - भाजप पाठोपाठ शिवसेनेकडूनही येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार आहे.

बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना तिकीट मिळाले. तसेच नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात आल्या आहेत. शिवसेना उमेदवारांची नावे याप्रमाणेनांदेड दक्षिण - राजश्री पाटील, मुरुड - महेंद्र शेठ दळवी, हदगाव - नागेश पाटील आष्टीकर, मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ, भायखळा - यामिनी जाधव, गोवंडी - विठ्ठल लोकरे, एरोंडेल/ पारोळा - चिमणराव पाटील, वडनेरा - प्रीती संजय, श्रीवर्धन - विनोद घोसाळकर,कोपर पाचकपडी - एकनाथ शिंदे, वैजापूर - रमेश बोरनावे, शिरोळ - उल्हास पाटील, गंगाखेड - विशाल कदम, दापोली - योगेश कदम, गुहागर - भास्कर जाधव, अंधेरी पूर्व - रमेश लटके, कुडाळ - वैभव नाईक, ओवला माजीवाडे - प्रताप सरनाईक, बीड - जयदत्त क्षीरसागर, पारठाणे - सांदीपान भुमरे, शहापूर - पांडुरंग बरोला, नगर शहर - अनिलभैय्या राठोड, सिल्लोड - अब्दुल सत्तार, औरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाट, अक्कलकुवा - आमशा पडवी, इगतपुरी - निर्मला गावित, वसई - विजय पाटील, नालासोपारा - प्रदीप शर्मा, सांगोला - शाबजी बापू पाटील, कर्जत - महेंद्र थोरवे,धनसावंगी - डॉ.हिकमत दादा उधन, खानापूर - अनिल बाबर, राजापूर - राजन साळवी, करवीर - चंद्रदीप नरके, बाळापूर - नितीन देशमुख, देगलूर - सुभाष सबणे, उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले,दिग्रस - संजय राठोड, परभणी - डॉ.राहुल पाटील, मेहकर - डॉ.संजय रायमुलकर, जालना - अर्जुन खोतकर, कळमनुरी - संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर, औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट, चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर, वरळी - आदित्य ठाकरे, शिवडी - अजय चौधरी, इचलकरंजी - सुजित मिणचेकर, राधानगरी - प्रकाश आबिटकर, पुरंदर - विजय शिवतारे, दिंडोशी - सुनील प्रभु, जोगेश्वरी पूर्व - रवी वायकर, मागठाणे - प्रकाश सुर्वे, गोवंडी - विठ्ठल लोकरे, विक्रोळी - सुनील राऊत, अनुशक्ती नगर - तुकाराम काटे, चेंबूर - प्रकाश फतारपेकर, कुर्ला - मंगेश कुडाळकर, कलिना - संजय पोतनीस, माहीम - सदा सारवणकर, जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, पाचोरा - किशोर पाटील, मालेगाव - दादाजी भुसे, सिन्नर - राजाभाऊ वझे, निफाड - अनिल कदम, देवळाली - योगेश घोलपखेड - आळंदी - सुरेश गोरे, पिंपरी - गौतम चाबुकस्वार, येवला - संभाजी पवारनांदगाव - सुहास खांडे.

देवरीत तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर


देवरी,दि.01- जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद गोंदियाच्या संयुक्त वतीने तालुका स्तरीय  मूलभूत विकास प्रशिक्षणाचे आयोजन देवरी येथे नुकतेच करण्यात आले होते.
स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी एम एम मोटघरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे, गटसमन्वयक धनवंत कावळे, केंद्रप्रमुख शेंडे, श्री भानारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात 11 केंद्रातील 12 बीआरपी सुलभक, 170 शिक्षक सहभागी झाले होते. दुसèया टप्पा येत्या  5 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाचे संचलन विजय लोथे यांनी केले. उपस्थितांचे आभार रमेश उईके यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी  शंकर वलथरे, रामू शेंदरे, प्रमोद सिंगणजुडे आणि रमेश पटले यांनी सहकार्य केले. 

अखेर बहुप्रतिक्षित भाजप उमेदवारांची यादी जाहीर

आमगाव मधून पुराम, तिरोड्यातून रहांगडाले तर अर्जूनीमोरमधून बडोले रिंगणात


गोंदिया,दि.01- विधानसभा निवडणूकीसंबंधाना भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित असलेली उमेदवारांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे विद्यमान आमदारांनाच पक्षाने पुन्हा रिंगणात उतरविले आहे. तिरोडा मतदार संघातून विजय रहांगडाले, आमगाव देवरी मतदारसंघातून संजय पुराम तर अर्जूनी मतदार संघातून इंजि. राजकुमार बडोले यांना पु्न्हा संधी देण्यात आली आहे. या यादीमुळे आमगाव मतदार संघात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे गोंदिया मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचे नाव अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. याशिवाय मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे, घाटकोपर पूर्व मधून प्रकाश मेहता,  बोरीवलीतून विनोद तावडे, कामठी मतदार संघातील चंद्रशेखर बावनकुळे, वर्सोव्यातून भारती लव्हेकर, कुलाब्यातून राज पुरोहित आणि मुलुंडमधून सरदार तारासिंग यांच्या मतदार संघांना तूर्तास डावलण्यात आले आहे. या विद्यमान आमदार-मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाते की त्यांचे तिकीट कापले  जाते, याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले  जात आहेत.
देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, तर चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकींच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडेंना विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. भाजपानं मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून, अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपने विद्यमान 12 उमेवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. शिवेंद्रराजे सातारा विधानसभा मतदारसंघातून, तर सुधीर मुनगंटीवार बल्लालपूर, गिरीश महाजन यांना जामनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. नंदुरबार- विजयकुमार गावित, शहादा- राजेश पाडवी, नवापूर- भरत गावित, धुळे ग्रामीण- ज्ञानज्योती पाटील, सिंदखेडा- जयकुमार रावल, रावेर- हरिभाऊ जावळे, भुसावळ- संजय सावकारे, जळगाव शहर- सुरेश भोळे, अंमळनेर- शिरीश चौधरी, चाळीसगाव- मंगेश चव्हाण, मलकापूर- चैनसुख संचेती, चिखली- श्वेता महाले, खामगाव- आकाश फुंडकर, जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे, अकोट- प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा, अकोला पूर्व- रणधीर सावरकर, मूर्तिजापूर- हरिश पिंपळे, वाशिम- लखन मलिक, करंजा- डॉ. राजेंद्र पटणी, अमरावती- डॉ. सुनील देशमुख, दर्यापूर- रमेश बुंदिले, मोर्शी- डॉ. अनिल बोंडे, आर्वी- दादाराव केचे, हिंगणघाट- समीर कुणावर, वर्धा- पंकज भोयर, सावनेर- डॉ. राजीव पोतदार, हिंगणा- समीर मेघे, उमरेड- सुधीर पार्वे, नागपूर दक्षिण- मोहन मेटे, नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे, नागपूर मध्य- विकास कुंभारे, नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, नागपूर उत्तर- मिलिंद माने, अर्जुनी-मोरगाव- राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर तिरोरा- विजय रहांगडाळे, आमगावत- संजय पुरम, अरमोरी- कृष्णा गजबे, गडचिरोली- देवराव होली, राजुरा- संजय धोते, चंद्रपूर- नाना श्यामकुळे, चिमुर-कीर्तीकुमार भांगडिया, वणी- संजीव बोधकुरवर, राळेगाव- अशोक उईके, यवतमाळ- मदन येरावार यांना भाजपानं संधी दिली आहे. अर्णी – संदीप प्रभाळकर धुर्वे, भोकर- बापूसाहेब गोर्थेकर, मुखेड- तुषार राठोड, हिंगोली -तानाजी मुतकुळे, परतूर – बननराव दत्तात्रय लोणीकर, बदनापूर – नारायण कुचे, भोकरदान- संतोष रावसाहेब पाटील-दानवे, फुलांब्री – हरीभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, गंगापूर – प्रशांत बम, चांदवड – राहुल अहेर, नाशिक मध्य- देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम- सीमा हिरे, डहाणू- प्रकाश धनारे, विक्रमगड – हेमंत सावरा, भिवंडी पश्चिम- महेश चौगुले, मुरबाड -किशन काथोरे, कल्याण पूर्व – गणपत काळू गायकवाड, डोंबिवली- रविंद्र चव्हाण, मीरा-भाईंदर – नरेंद्र मेहता, ठाणे- संजय केळकर, एरोली- संदीप नाईक, बेलापूर – मंदा म्हात्रे, दहिसर- मनीषा चौधरी, मुलंड – मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर, चारकोर- योगेश सागर, गोरेगाव- विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम- अमित साटम, विलेपार्ले – पराग अलवानी, घाटकोपर पश्चिम – राम कदम, वांद्रे पश्चिम – आशीष शेलार, सायन कोळीवाडा – तामीळ सेल्वान हे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोपरगाव- स्नेहलता कोल्हे, नेवासा बाळासाहेब मुरकुटे, शेगाव मोनिका राजळे, राहुरी- शिवाजीराव कर्डीले, श्रीगोंदा- बबनराव पाचपुते, कर्जत जामखेड- राम शिंदे, गेवराई- लक्ष्मण पवार, माजलगाव- रमेश आडस्कर, आष्टी- भिमराव धोंडे, परळी- पंकजा मुंडे, अहमदपूर- विनायक जाधव पाटील, निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर, औसा- अभिमन्यू पवार, तुळजापूर- राना जगजित सिंह, सोलापूर शहर उत्तर- विजयराव देशमुख, सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख, वाई- मदन भोसले, मान- जयकुमार गोरे, कराड दक्षिण – अतुल भोसले, सातारा – शिवेंद्रसिंग भोसले, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, इचलकरंजी- सुरेश हळवणकर, मिरज ( SC)- सुरेश खाडे, सांगली – सुधीर गाडगीळ, शिराळा – शिवाजीराव नाईक, जत – विलासराव जगताप, वडाळा- कालीदास कोळंबकर, मलबार हिल- मंगलप्रभात लोढा, पनवेल- प्रशांत ठाकूर, पेण-रवीशेठ पाटील, शिरूर- बाबुराव पाचर्णे, इंदापूर हर्षवर्धन पाटील, चिंचवड- लक्ष्मण जगताप, भोसरी- महेश लांडगे, वडगाव शेरी- जगदीश मुळीक, शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला- भीमराव तापकीर, पर्वती – माधुरी मिसाळ, हडपसर- योगेश टिळेकर, पुणे कॅन्टोन्मेंट- सुनिल कांबळे, कसबा पेठ- मुक्ता टिळक, अकोले- वैभव पिचड, शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

आजपासून त्या सहा नियमांत बदल


important changes from 1 october 2019 that will affect your life? | आजपासून बदलणार हे सहा नियम, 'असा' पडणार सामान्य नागरिकांवर प्रभावनवी दिल्लीः 1 आजपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरपासून बँकिंग सेवांमध्ये बरेच बदल झाले आहेत. विशेष म्हणजे हे बदल ग्राहकांना स्वस्त आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार एसबीआयसह अनेक बँकांनी कर्जांचे व्याजदर रेपो रेटशी जोडत आहेत. तसेच 1 ऑक्टोबरपासून दुकान आणि वाहन कर्जही स्वस्त झाले आहे. एसबीआयने खात्यातील किमान शिल्लक रकमेच्या नियमातही अनेक बदल केले आहेत. तसेच डीएल आणि गाडीच्या रजिस्ट्रेशन कार्डासंबंधीही नवे नियम लागू झाले आहेत. घरगुती गॅसच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. स्वस्त झालेले गृह अन् वाहन कर्ज भारतीय स्टेट बँकेने हाऊसिंगबरोबरच एमएसएमई आणि रिटेल कर्ज प्रकरणात सर्वच फ्लोटिंग रेटच्या कर्जाला रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा बँकेतील कोट्यवधी ग्राहकांना फायदा होणार आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यक्तिगत कर्ज आणि एमएसएमई सेक्टरमध्ये फ्लोटिंग रेटने घेतलेले कर्ज, यावरील व्याज 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत रेपो रेटमध्ये 1.10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. परंतु, बँकांनी कर्ज फक्त 0.30 टक्क्यांनी स्वस्त केले आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून व्याजदरात घसघशीत कपात करण्यात येणार आहे. त्यासोबतच रेपो रेट आणि अन्य संबंधित मानके विचारात घेऊन दर तीन महिन्यांत कमीत कमी एकदा तरी व्याजदरात बदल करण्याची सूचनाही रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना केली आहे.  
  बँक खात्यातील किमान शिल्लक रकमेच्या नियमांत बदलबँक खात्यातील किमान शिल्लक रक्कम(मिनिमम बॅलन्स) 5 हजारांहून घटवून 3 हजार रुपये करण्यात आला आहे. तरीही कोणत्याही व्यक्तीला 3 हजार रुपयेदेखील खात्यात जमा करण्यास अडचण येत असल्यास आणि त्याच्या खात्यात 1500 रुपये असल्यास त्या व्यक्तीकडून 10 रुपये शुल्क आणि जीएसटी वसूल केला जाणार आहे. सेमी अर्बन शाखेतील एसबीआय ग्राहकांना स्वतःच्या खात्यात महिन्यामध्ये किमान शिल्लक रकमेच्या स्वरूपात 2 हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. तर ग्रामीण शाखेत 1000 रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे. डीएल- आरसीचा होणार कायापालटमोटारसायकल आणि गाडी चालविण्यासाठी वाहन परवाना गरजेचा असतो. 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे रूपाचा कायापालट होणार आहे. सरकार लवकरच ड्रायव्हिंग लायसन्समध्ये चिप आणि क्यूआर कोड देणार आहे. चिप आणि क्यूआर कोड बसवलेले लायसन्स 1 ऑक्टोबरपासून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स अधिकाऱ्यांच्या मते, डीएल आणि गाडी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दोन्ही एकसारखेच असणार आहेत. क्यूआर कोडमुळे हे सर्व लायसन्स परिवहन विभागाच्या कॉम्युटरसोबत जोडल्या जातील. मायक्रो चिप आणि क्यूआर कोडमुळे कोणताही चालक आपली चूक लपवू शकणार नाही. क्यूआर कोडद्वारे केंद्रीय डेटा बेसने वाहन चालक किंवा वाहनासंबंधीचे सर्व रेकॉर्ड एकाच ठिकाणी मिळणार आहेत. क्यूआर कोडला स्कॅन करताचा गाडीची आणि चालकाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...