देवरी,दि.01- जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद गोंदियाच्या संयुक्त वतीने तालुका स्तरीय मूलभूत विकास प्रशिक्षणाचे आयोजन देवरी येथे नुकतेच करण्यात आले होते.
स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी एम एम मोटघरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे, गटसमन्वयक धनवंत कावळे, केंद्रप्रमुख शेंडे, श्री भानारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात 11 केंद्रातील 12 बीआरपी सुलभक, 170 शिक्षक सहभागी झाले होते. दुसèया टप्पा येत्या 5 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाचे संचलन विजय लोथे यांनी केले. उपस्थितांचे आभार रमेश उईके यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी शंकर वलथरे, रामू शेंदरे, प्रमोद सिंगणजुडे आणि रमेश पटले यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment