तिरोडा,दि.24ः-महाराष्ट्र विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय भरतलाल रहागंडाले यांनी मताधिक्याने विजय मिळवित ही जागा भाजपकडे कायम ठेवली आहे.
त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा पराभव केला.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बंडखोर उमेदवार दिलीप बनसोड यांनी तिहेरी लढत निर्माण केल्यामुळे भाजपला लाभ मिळाला.बनसोड यांनी घेतलेल्या 33 हजार मतांनी राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाली आणि भाजपच्या विजयाा मार्ग सुकर झाला.निकाल घोषीत होताच भाजप उमेदवार विजय रहागंडालेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. बहुजन समाज पक्षाचे कमल हटवार 2506, राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत बोपचे 50213,भारतीय जनता पक्षाचे विजय रहांगडाले 75773,अपक्ष दिलीप बन्सोड 33092, वंचित बहुजन आघाडीचे संदीप तिलगामे 1600 मते आणि नोटा 1837 मते पडली.
No comments:
Post a Comment