भंडारा,दि. 20 :- निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा झाली असून 21 ऑक्टोबर 2019 रोजी भंडारा जिल्हयामध्ये सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हयात बाजाराचे दिवशी नागरिकांची गर्दी होवून मतदान प्रक्रियेत अडथडा निर्माण होवू नये याकरीता जिल्हयातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत. उद्या बंद ठेवून अन्य दिवशी, आपल्या सुविधेनूसार आठवडी बाजार भरविता येणार आहे.
सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावावा या करीता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांना विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबवून आवाहन करण्यात आले असून मतदाराचा सहभाग वाढावा याकरीता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत. आज 20 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान पथक सर्व निवडणूक साहित्यासह रवाना झाले असून 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निर्भय व निरपेक्ष वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडावी याकरीता कलम 37 लागू करण्यात आली आहे.
स्थानिक आठवडी बाजाराच्या निमित्याने मतदान केंद्राच्या परिसरात मोठया प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून त्यांच्या फायदा समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बाधीत करण्याचा हेतू ठेवण्यासाठी या लोकांडून होण्याचा संभव नाकारता येत नाही आणि अंमलात असलेली निवडणूक आचार संहिता भंग करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील विधानसभा मतदार संघासाठी होणारे मतदान हे निर्भय, निरपेक्ष वातावरणात पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती शाबूत रहावी याकरीता 21 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हयात भरणारे सर्व ठिकाणाचे आठवडी बाजार बंद ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा सोयीच्या इतर दिवशी बाजार भरविण्याची कार्यवाहीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी निर्गमित केले आहे.
No comments:
Post a Comment