Saturday 5 October 2019

मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत दुपटीपेक्षा जास्त वाढ

Image result for fadnavisनागपूर,दि,05 : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार, गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत तब्बल १०७ टक्क्यांने वाढ झाली आहे. मिसेस सीएमच्या संपत्तीमध्ये सुद्धा 97 टक्के वाढ झाली आहे.२०१४ साली मुख्यमंत्र्यांकडे २३ लाख ३ हजार ६३० रुपयांची जंगम आणि १ कोटी ८१ लाख १० हजार ५०० रुपयांची स्थावर संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा २ कोटी ४ लाख १४ हजार १३० होता. २०१९ मध्ये हा आकडा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ वर पोहोचला आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत २ कोटी २० लाख ९ हजार ५०४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची जंगम तर ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची स्थावर संपत्ती आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी शपथपत्रात चार प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची नोंद असल्याचा उल्लेख केला आहे. यात २०१४ साली शपथपत्रात दोन गुन्हे प्रकरणांची नोंद न केल्याच्या प्रकरणाचा देखील समावेश आहे. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर २०१४ साली २ कोटी ३० लाख ७१ हजार २०६ रुपयांची संपत्ती होती. ती आता वाढून ४ कोटी ३८ लाख ९७ हजार ७४१ इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत ९०.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या नावावर ३ कोटी ३९ लाख ५८ हजार ७४१ रुपयांची जंगम तर ९९ लाख ३९ हजारांची स्थावर संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या चार खासगी तक्रारीमुख्यमंत्र्यांनी शपथपत्रात चार खासगी तक्रारींच्या प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा (एफआयआर) दाखल नाही. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या चार खासगी तक्रारींपैकी तीन तक्रारी सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे. सतीश उके यांनी ज्या तीन खासगी तक्रारी केल्या आहेत, त्यापैकी पहिले प्रकरण हे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायदंडाधिकाऱ्यांकडे ‘रेफर बॅक’ झालेले आहे.हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ (अ) अन्वये आहे. दुसरे प्रकरण हेसुद्धा कलम लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२५ (अ) अन्वये असून ती तक्रार उच्च न्यायालयापुढे आहे व यात आरोपनिश्चिती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे रोख रक्कम रु.१७ हजार५००,ठेवी रु.८लाख २९ हजार ६६६, विमा पॉलिसी रु.१४ लाख ३१९ रुपये चारचाकी वाहन ६ लाख (महिंद्र एक्सयूव्ही), दुचाकी ७ हजार, सोने १७ लाख ४०हजार १५०, जमीन ५८ लाख ४० हजार(४.९६६ एकर) आणि घर ३ कोटी १९ लाख ८९ हजार एवढी वैयक्तिक संपत्ती आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...