संतनगरीतील ती घोषणा ठरली फोल
आमदार बडोलेनी केलेल्या होंर्डींगबाजीचे काय?
आमदार बडोलेनी केलेल्या होंर्डींगबाजीचे काय?
खेमेंद्र कटरे/गोंदिया,दि.02- मुख्यमंत्र्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती अर्जूनीमोर येथील संत चोखोबा नगरी. पुरस्कार वितरणाचा तो नेत्रदीपक सोहळा. साक्षीला होते ते ७ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन. मुख्यमंत्री महोदय आले. पालकमंत्री सुद्धा गद्गद् झाले. मुख्यमंत्र्यांनी संताच्या नगरीत गोंदिया जिल्ह्यासाठी राइस पार्कची घोषणा ठोकून दिली. तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या आनंदालाही चांगलेच भरते आले. पाहता पाहता जिल्हा होर्डींगमय करून टाकला. पण दुर्दैव…! दीडच वर्षात मुख्यमंत्र्यांची ती चॉकलेटी घोषणा हवेतच फुर्रर्र झाली. आता निवडणुकीच्या प्रचारात आमदार बडोलेंसमोर या समस्येची सोडवणूक कशी करायची? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या बाता करणाèयांच्या राज्यात गोंदिया जिल्हा भकास झाला, अशी म्हणण्याची पाळी आता गोंदिया जिल्ह्यावर आली असल्याच्या चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत.
गेल्या दीडवर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पहिल्या राइस पार्कची घोषणा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे पार पडलेल्या ७व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केली होती. या घोषणेला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील सर्वच एमआयडीसी क्षेत्रात या राइस पार्कचा शोध घेतल्यास घोषित केलेला राज्यातील पहिला राइस पार्क शोधूनही सापडेना. परिणामी, मोठा गाजावाजा केलेला राज्यातील पहिला गोंदिया जिल्ह्यातील राइस पार्क कुठे गेलाŸ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसह आमदार बडोले साहेबांना विचारण्याची दुर्दैवी वेळ जिल्हावासीयांवर आली आहे.
.अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात फेब्रुुवारी २०१८ मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियासाठी राइस पार्कची घोषणा केली होती. यात देशातील धानाच्या विविध प्रजातींच्या वाणावर सखोल संशोधन करून बदलत्या नैसर्गिक वातावरणात टिकाव धरून मानवासाठी आवश्यक मूलभूत अन्नतत्वे मोठ्या प्रमाणात उत्पादित करणाèया नवीन वाणांचा विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितले होते. या राइस पार्कमुळे धानाच्या संशोधनाला मोठी चालना मिळेल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. अलीकडेच भंडारा जिल्ह्यात राइस क्लस्टरचा उपक्रम देण्याचा निर्णय झाला. आता गोंदिया जिल्ह्यात राइस पार्क देण्याचा निर्णय आजच जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.
त्या घोषणेनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपच्या नेत्यांनी व तत्कालीन पालकमंत्र्यांनी मोठ मोठी होर्डींगबाजीही केली होती. मात्र, यानंतर त्या राइस पार्कचे पुढे काय झाले? हे आज कुणालाही सांगता येत नाही. त्या घोषणेनंतर मात्र जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी राइस पार्कच्या माध्यमातून धानाच्या विविध जातींवर सखोल संशोधन केले जाईल. बदलत्या ऋतुमानात जोमाने टिकाव धरू शकेल, कोणत्याही नैसर्गिक रोगराई, बदलत्या हवामानाला बळी पडणार नाही आणि मानवी आरोग्याला लाभकारक तसेच भरपूर उत्पादन देऊ शकेल, अशा वाणांचे संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य राइस पार्कच्या माध्यमातून केले जाईल, असे ठणकावून सांगितले होते. आजवर देशात केवळ कर्नाटकातच असा राइस पार्क आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीला स्टेजवरच मंजुरी दिल्यामुळे देशात दुसरा आणि राज्यात पहिला राइस पार्क मिळण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला मिळाला, असे गौरवोद्गार सुद्धा बडोले काढायला विसरले नव्हते. राइस पार्क ही संकल्पना केवळ संशोधनापुरतीच मर्यादित नाही तर धानापासून विविध पदार्थ, वस्तू निर्माण करून त्याचे मार्केqटगसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा खèया अर्थाने राइस सिटी सोबतच आता राइस पार्क सिटी म्हणून जागतिक पातळीवर उदयास येईल, असा आत्मविश्वासही श्री बडोले यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. तो विश्वास सार्थ करण्यात मात्र ते सपशेल अपयशी ठरले. हे सत्य आता त्यांना नाकारण्याचे काही कारण नाही.
No comments:
Post a Comment