Monday 7 October 2019

शरद पवारांचा उद्यापासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा




मुंबई दि. ७ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे.
पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दिनांक ८ ते १० ऑक्टोबरपर्यत शरद पवार झंझावाती दौरा करणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११. ३० वाजता, पारोळा सायंकाळी ५ वाजता, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे सकाळी ११. ३० वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा – कारंजा दुपारी ४ वाजता, दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी १०. ३० वाजता, बुटीबोरी- हिंगणा ३ वाजता, काटोल ५ वाजता आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...