Monday, 7 October 2019

October 7, 2019   विदर्भ गोंदियात भाजप बंडखोर अग्रवाल,तिरोड्यात राँकाचे बनसोड तर आमगावात काँग्रेसचे राऊत रिंगणात कायम


गोंदिया,दि.०७ः-गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघातील निवडणुक सर्वात लक्षवेधी ठरणार असून याठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.त्यामुळे गोंदियात भाजप उमेदावर गोपालदास अग्रवालासमोर आवाहन उभे झाले आहे. तर तिरोडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी सर्व शिष्टाईबाजुला सारत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने याठिकाणी भाजपच्या विजयाचा मार्ग बनसोड यांच्या उमेदवारीने सुकर झालेला आहे.भाजपचा विजय रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे म्हणनारे बंसोडच रिगंणात राहिल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अडचण निर्माण झाली आहे.तरीही २०१४च्या तुलनेत यावेळच्या स्थितीत बदल झाल्याने राष्ट्रवादीला तेवढा फटका बसणार नसले तरी लढत ही भाजपचे विजय रहागंडाले व राष्ट्रवादीच्या रविकांत बोपचेमध्येच होणार आहे.बनसोड यांना तिहेरी लढतीसाठी खुप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार रामरतन राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे.मात्र यामतदारसंघात राऊत यांच्या उमेदवारींने काँग्रेसला थोड्याफार नुकसान होईल त्याचा लाभ भाजपला लाभ होण्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत असले तरी खरी लढत ही भाजपचे संजय पुराम व काँग्रेसच्या सहसराम कोरेटीतच होणार आहे.अर्जुनी मोरगाव मतदारसंघात काँग्रेसच्या सर्वच बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी मंत्री राजकुमार बडोले विरुध्द राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्यातच ही लढाई होणार आहे.
विनोद अग्रवाल यांनी माघार घ्यावी यासाठी पालकमंत्री डाॅ.परिणय़ फुके व भाजप संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर यांनी स्वागत लाॅन येथे विनोद अग्रवाल यांची भेट घेतली.मात्र अग्रवाल यांनी आपण जनतेचे उमेदवार आहोत,कार्यकर्त्यांसाठी रिगणात असल्याने माघार घेणार नसल्याचे स्पष्ट करताच आल्या पावल्या परत जावे लागले.तिकडे अर्जुनी मोरगाव मध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसच्या बंडखोरांना शांत करण्यात यश आले मात्र तिरोड्यात दिलीप बनसोड यांना माघार घ्यायला लावण्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना अपयश आल्याने प्रफुल पटेलासांठी तिरोड्याची जागा आता प्रतिष्ठेची झाली आहे.प्रफुल पटेल ही निवडणुक कितपत डोक्यावर घेतात याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...