गडचिरोली,दि.04 : जिल्ह्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताच्या इराद्याने लपवून ठेवलेला नक्षल्यांचा साहित्य साठा गडचिरोली पोलीस दलाच्या हाती लागला आहे.पेंढरीच्या जंगलात सी-60चे पथक हे गस्तीवर असताना त्यांनी शोधमोहिमेत नक्षल्यांचा मोठा कट उधळून लावत साहित्य जप्त केले आहे.
पेंढरी जंगल परिसरात नक्षल्यांनी साहित्य लपवून ठेवले होते. यामध्ये 14 नग 2 इंच मोटार सेल,14 हॅंडग्रेनेड,15 किलो जिलेटिन5 ते 7 किलो जिवंत स्पोटक असलेला प्रेशर कुकर,कुकर बाँब,नक्षली ड्रेस वायर,विद्युत साहित्य आदी मोठ्या प्रमाणात स्फोटकासाठी वापरल्या जाणार्या साहित्याचा समावेश आहे. पोलिस दलाच्या वतीने जंगल परिसरात शोधमोहिम तिव्र करण्यात आली असून पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे यांनी सी 60 जवानांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment